Mumbai : आदित्य ठाकरेंना ५०० कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस; 'मातोश्री' बाहेर हायव्होल्टेज ड्रामा

दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून ठाकरे कुटुंबाच्या 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर शनिवारी हायव्होल्टेज ड्रामा रंगला.
Mumbai : आदित्य ठाकरेंना ५०० कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस; 'मातोश्री' बाहेर हायव्होल्टेज ड्रामा
Mumbai : आदित्य ठाकरेंना ५०० कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस; 'मातोश्री' बाहेर हायव्होल्टेज ड्रामा
Published on

मुंबई : दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून ठाकरे कुटुंबाच्या 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर शनिवारी हायव्होल्टेज ड्रामा रंगला. दिशा सालियानचे वडील सतीश सालियान हे आज वकिलांसह आदित्य ठाकरे यांना ५०० कोटी रुपयांच्या दाव्याची अब्रुनुकसानीच्या कायदेशीर नोटीस बजावण्यासाठी 'मातोश्री'वर पोहोचले. मात्र, त्यांना बंगल्यात प्रवेश देण्यात आला नाही. अखेर आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी 'मातोश्री' च्या मुख्य प्रवेशद्वारावरच नोटीस स्वीकारली. दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून गेल्या काही वर्षांपासून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता अब्रुनुकसानीच्या नोटिशीमुळे या प्रकरणाला पुन्हा एकदा कायदेशीर आणि राजकीय वळण मिळाले आहे.

आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियान प्रकरणासंदर्भात सोशल मीडियावर केलेल्या कथित वक्तव्यांवर आक्षेप घेत सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरे तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात अब्रुनुकसानीची कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणी ५०० कोटी रुपयांची नुकसानभरपाई आणि सार्वजनिक माफी मागण्याची मागणी करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

मला कोणीही कंट्रोल करू शकत नाही

'मातोश्री' वर जाण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सतीश सालियान यांनी आक्रमक भूमिका मांडली. मला कोणीही कंट्रोल करू शकत नाही. फक्त देव मला कंट्रोल करू शकतो, दुसरे कोणीही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्यासोबत वकिलांची संपूर्ण टीम असल्याचे सांगत, या प्रकरणात कायदेशीर लढा देण्यासाठी आपण सज्ज असल्याचेही त्यांनी नमूद केले. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याबद्दल समाधान व्यक्त करताना, या प्रकरणात न्याय मिळण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

संरक्षणाची मागणी

सतीश सालियन यांनी सीबीआयला पत्र लिहून चार जणांसाठी म्हणजे सतीश सालियन, मी स्वतः एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे आणि आशुतोष पाठक यांच्यासाठी त्वरित पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. त्यांनी सीबीआयला तात्काळ पोलीस सुरक्षा पुरवण्यासाठी आवश्यक वेगाने पावले उचलण्याची विनंती केली आहे, असे ओझा यांनी स्पष्ट केले.

प्रतिज्ञापत्र खोटे

ओझा पुढे म्हणाले, "नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या अहवालात आदित्य ठाकरे यांचा ड्रग्ज व्यवसायात सहभाग असल्याचे नमूद केले आहे. त्यांच्याविरोधात सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शीचे पुरावे, आणि बलात्कार तसेच हत्येचे आरोप आहेत. आम्ही हे सर्व उघडपणे सांगत आहोत. जर हे खोटे असेल तर तुमच्याकडे कायदेशीर तरतुदी नाहीत का, एकदा ते (ठाकरे) या आरोपांविरोधात न्यायालयात गेले होते, पण त्यांचे प्रतिज्ञापत्र (अॅफिडेव्हिट) खोटे निघाल्याने त्यांना माफी मागावी लागली होती. कोणी काय म्हणते त्याने आम्हाला फरक पडत नाही. त्यांना काय करायचे ते करू दे; आम्ही आमचा कायदेशीर मार्ग अवलंबत आहोत, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in