रेमडेसिव्हिर इंजेक्शन घोटाळा प्रकरण : आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय पुण्य पारेख यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी

कोविड काळात झालेल्या कथित रेमडेसिव्हिर इंजेक्शन घोटाळा प्रकरणी(Remdesivir injection scam.) पुण्य पारेख यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी केली जात आहे.
रेमडेसिव्हिर इंजेक्शन घोटाळा प्रकरण : आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय पुण्य पारेख यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय पुण्य पारेख यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने(EOW)चौकशीलाठी बोलावले आहे. कोविड काळात झालेल्या कथित रेमडेसिव्हिर इंजेक्शन घोटाळा प्रकरणी(Remdesivir injection scam.) पुण्य पारेख यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मे/जून 2020मध्ये मुंबईच्या तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या बंगल्यावर एक बैठक पार पडली होती. ज्यात बीएमसीचे अधिकारी आणि डॉक्टर यांना बोलावण्यात आले होते. या बैठकीत कोणाला ठेका द्यायचा आणि कोणाला देऊ नये, याबाबतचा निर्णय घेण्यात येणार होता. या बैठकीला पुण्य पारेख देखील उपस्थित होते.

काय आहे कथित रेमडेसिव्हिर इंजेक्शन घोटाळा प्रकरण?

कथित रेमडेसिव्हिर इंजेक्शन घोटाळा हा कोविड काळात घडलेला घोटाळा आहे. यात 5.96 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचे सांगितले जाते. ज्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे दर वाढवले गेले. या घोटाळ्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शन हे 650 रुपयांऐवजी 1,568 रुपये प्रति नग दाखवले गेल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे.

कोण आहेत पुण्य पारेख?

कथित रेमडेसिव्हिर इंजेक्शन घोटाळ्याप्रकरणी चर्चेत आलेले पुण्य पारेख हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे जवळचे मित्र आहेत. या दोघांनी एकत्र शिक्षण घेतले असून ते बऱ्याचा काळापासून एकमेकांना ओळखतात. दरम्यान, रेमडेसिव्हिर इंजेक्शन घोटाळ्याप्रकरणी पुण्य पारेख यांची चौकशी होणार असल्याने आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in