Mumbai : भांडुपच्या नव्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करा; अभिजीत बांगर यांचे आदेश

मुंबईची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन भांडुप संकुलात उभारण्यात येणाऱ्या २ हजार दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेच्या नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम निर्धारित मुदतीपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
Mumbai : भांडुपच्या नव्या जलशुद्धीकरण  प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करा; अभिजीत बांगर यांचे आदेश
Mumbai : भांडुपच्या नव्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करा; अभिजीत बांगर यांचे आदेश
Published on: 

मुंबई : मुंबईची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन भांडुप संकुलात उभारण्यात येणाऱ्या २ हजार दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेच्या नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम निर्धारित मुदतीपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. प्रकल्पातील स्थापत्य, विद्युत, यांत्रिक आणि जलशुद्धीकरण प्रक्रियेची कामे समांतरपणे वेगाने पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

भांडुप संकुलातील नवीन जलशुद्धीकरण केंद्र आणि जलउदंचन केंद्राच्या कामांची बांगर यांनी गुरुवारी पाहणी केली. यावेळी प्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्प) चंद्रकांत चौधरी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रकल्पाच्या कामांचा आढावा घेताना विविध विभागांमध्ये समन्वय राखून कामांचे नियोजन करावे, अडथळे तातडीने दूर करावेत आणि नियमित आढावा घेऊन कामे निर्धारित कालावधीपूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

पाण्याची गुणवत्ता सुधारण्यावर भर!

जलशुद्धीकरण प्रकल्पात क्लोरिनेशन कॉन्टॅक्ट टँक, ॲक्टिफ्लो तंत्रज्ञानाद्वारे गढूळपणा व सूक्ष्म घनकण वेगळे करणे, फ्लो स्प्लिटर, ड्युअल मीडिया फिल्टर, बॅकवॉश यंत्रणा, ॲक्टिडायन प्रक्रिया आणि सांडपाणी उपसा यंत्रणा यांचा समावेश आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पाण्याची गुणवत्ता सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)