Mumbai : ‘एआय’च्या मदतीने बनावट पासचे आणखी एक प्रकरण; तीन जणांवर गुन्हा दाखल, एसी लोकलमधून करत होते प्रवास

एआयच्या मदतीने बनावट पास बनवून एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या इंजिनिअर दाम्पत्याची चोरी पकडण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा तसेच प्रकरण समोर आले आहे. मध्य रेल्वे मार्गावरील वातानुकूलित लोकलचा प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी चक्क एआयचा वापर करून बनावट पास बनविल्याचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे.
‘एआय’च्या मदतीने बनावट पासचे आणखी एक प्रकरण; तीन जणांवर गुन्हा दाखल, एसी लोकलमधून करत होते प्रवास
‘एआय’च्या मदतीने बनावट पासचे आणखी एक प्रकरण; तीन जणांवर गुन्हा दाखल, एसी लोकलमधून करत होते प्रवास
Published on

मुंबई : एआयच्या मदतीने बनावट पास बनवून एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या इंजिनिअर दाम्पत्याची चोरी पकडण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा तसेच प्रकरण समोर आले आहे. मध्य रेल्वे मार्गावरील वातानुकूलित लोकलचा प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी चक्क एआयचा वापर करून बनावट पास बनविल्याचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी मध्य रेल्वे पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे प्रवासी तिकीट निरीक्षक प्रशांत कांबळे हे तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसह परळ-कल्याण वातानुकुलीत लोकलमध्ये नियमित तपासणी करत होते. या दरम्यान ३ प्रवासी मासिक पास दाखविणारे आढळले. यामध्ये १ तरुणी आणि २ तरुणांनी यूटीएस जनरेटेड सीझन तिकिटे दाखवले. त्यांनी मोबाईल फोनमधील “माय फाइल्स-डॉक्युमेंट्स” या फोल्डरमधून ही तिकिटे उघडून दाखवली. यामुळे तिकीट परीक्षकांनी संशय आला. त्यांनी सर्वांच्या पासची बारकाईने तपासणी केली असता त्यांचा युटीएस क्रमांक एकच आढळला. तर इतर तपशील वेगळे होते. याबाबत अधिक तपास केला असता कोणीही आपल्या मोबाईल क्रमांकांद्वारे कोणतेही तिकीट घेतले नसल्याचे स्पष्ट झाले.

नीरज तलरेजा, अथर्व बाग आणि अदिती मंगलुरकर अशी या प्रवाशांची नावे आहेत. कुर्ला पोलिसांनी केलेल्या तपासात बनावट सीझन तिकिटे एआयने तयार केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in