Mumbai : १३६ फेरीवाल्यांवर कारवाई; दहिसरमध्ये पादचारी प्रथम अभियानाला वेग

पादचाऱ्यांसाठी रस्ते आणि पदपथ मोकळे करण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिकेच्या ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत दहिसर पूर्व आणि पश्चिम परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे.
Mumbai : १३६ फेरीवाल्यांवर कारवाई; दहिसरमध्ये पादचारी प्रथम अभियानाला वेग
Mumbai : १३६ फेरीवाल्यांवर कारवाई; दहिसरमध्ये पादचारी प्रथम अभियानाला वेग
Published on

मुंबई : पादचाऱ्यांसाठी रस्ते आणि पदपथ मोकळे करण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिकेच्या ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत दहिसर पूर्व आणि पश्चिम परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. पादचारी प्रथम अभियानांतर्गत आतापर्यंत तब्बल १३६ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आल्याचे आर उत्तरचे सहाय्यक आयुक्त रोहित त्रिवेदी यांनी सांगितले. 

पदपथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी असून सुरक्षित फुटपाथ पादचाऱ्यांच्या हक्काचे आहेत. अतिक्रमण मुक्त फुटपाथ यासाठी मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी पादचारी प्रथम अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत मुंबई महापालिकेच्या २६ वार्डात अतिक्रमण मुक्त फुटपाथ ही कारवाई सुरु आहे. दहिसर पोूर्वव पश्चिमेला अतिक्रमण मुक्त फुटपाथ ही कारवाई उपायुक्त मनिष वळंजु यांच्या मार्गदर्शनाखाली व आर उत्तर विभागाचे सहायक आयुक्त रोहित त्रिवेदी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, अतिक्रमण मुक्त फुटपाथ ही कारवाई यापुढेही सुरुच राहणार असल्याचे रोहित त्रिवेदी यांनी सांगितले.

 दहिसर पूर्व व पश्चिमेला ७ ऑगस्टपासून सुरू असलेल्या या कारवाईत आतापर्यंत १३६ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली असून, बेकायदा बांधकामे स्टाॅल तात्पुरत्या शेड जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.

मार्गातील अडथळे दूर

दहिसर पूर्व भागातील भरूचा रोड, जवळे रोड आणि हरिशंकर जोशी मार्ग, तसेच दहिसर पश्चिमेकडील एस. व्ही. पी. रोड आणि लक्ष्मण म्हात्रे रोड या प्रमुख रस्त्यांवर महापालिकेच्या पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. या रस्त्यांवरील पदपथ तसेच पादचाऱ्यांच्या ये-जा करण्याच्या मार्गावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in