Mumbai : फ्री प्रेस जर्नल मार्गाने घेतला मोकळा श्वास; बेकायदा चहा टपरी, वडापावच्या दुकानांवर कारवाई

‘पदपथ’ हे पादचाऱ्यांसाठीच असून सुरक्षित फुटपाथ मुंबईकरांना मिळावेत यासाठी तेथील बेकायदा बांधकामे, स्टॉल्स, तात्पुरत्या शेड हटवण्याची मोहीम मुंबई महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
Mumbai : फ्री प्रेस जर्नल मार्गाने घेतला मोकळा श्वास; बेकायदा चहा टपरी, वडापावच्या दुकानांवर कारवाई
Mumbai : फ्री प्रेस जर्नल मार्गाने घेतला मोकळा श्वास; बेकायदा चहा टपरी, वडापावच्या दुकानांवर कारवाई
Published on: 

मुंबई : ‘पदपथ’ हे पादचाऱ्यांसाठीच असून सुरक्षित फुटपाथ मुंबईकरांना मिळावेत यासाठी तेथील बेकायदा बांधकामे, स्टॉल्स, तात्पुरत्या शेड हटवण्याची मोहीम मुंबई महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत बुधवारी नरिमन पॉइंट येथील फ्री प्रेस जर्नल मार्गावर असलेल्या फुटपाथवरील चहाच्या बेकायदा टपऱ्या, वडापावच्या दुकानांवर हातोडा फिरवण्यात आला. ‘ए’ वार्डात कारवाईची मोहीम यापुढे ही सुरुच राहणार असल्याचा इशारा वार्डचे सहाय्यक आयुक्त उज्वल इंगोले यांनी दिला आहे.

पदपथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी असून ५० टक्के पादचारी त्याचा वापर करीत करतात. त्यामुळे पादचाऱ्यांना मोकळे व सुरक्षित फुटपाथ मिळावेत यासाठी मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशानुसार ‘पादचारी प्रथम’ अभियान मुंबई महापालिकेच्या २६ विभागांत राबविण्यात येत आहे.

पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा होता प्रश्न

नरिमन पॉइंट हा कार्यालयीन कर्मचारी व व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचा परिसर असून या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. मात्र, फुटपाथवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या टपऱ्या आणि फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्याची वेळ येत होती. त्यामुळे वाहतूक कोंडीसोबतच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता पादचारी प्रथम अभियानांतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे उज्ज्वल इंगोले यांनी सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in