Mumbai : बेकायदा फटाका विक्रेत्यांवर होणार कारवाई; BMC च्या परवाना विभागाकडून निर्देश जारी

पालिकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिका हद्दीत केवळ बी, एल आणि पी-उत्तर या विभागांतच फटाका विक्रीसाठी अधिकृत परवाने दिले आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : पालिका क्षेत्रात बेकायदा फटाके विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे. तसे निर्देश पालिकेच्या परवाना विभागाने जारी केले आहेत.

दिवाळीचा सण जवळ आला की विविध ठिकाणी रस्ते, पदपथांवर फटाक्यांची विक्री केली जाते. त्यांना हटविण्याची तत्काळ कारवाई केली जावी, असे अतिक्रमण निर्मुलन तसेच परवाना विभागाच्या विभाग स्तरावरील अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. याशिवाय जे परवानाधारक फटाका विक्रेते आहेत, त्यांच्याकडे विहीत मर्यादेपेक्षा जास्त फटाक्यांचा साठा असेल तर तोसुद्धा जप्त केला जाणार आहे. त्याबाबतचा अहवाल दैनंदिन स्वरुपात पालिका उपायुक्तांना सादर केला जाणार आहे.

पालिकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिका हद्दीत केवळ बी, एल आणि पी-उत्तर या विभागांतच फटाका विक्रीसाठी अधिकृत परवाने दिले आहेत. सध्या दिवाळीची लगबग सुरू आहे. फटाके खरेदीलाही वेग आला आहे. त्यानिमित्त फटाके विक्री जोरात सुरू आहे. बेकायदा फटाके विक्री रोखण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.

logo
marathi.freepressjournal.in