महाराष्ट्र दिनापासून 'मुंबई अगेन्स्ट ड्रग्ज' मोहीम; नशामुक्त मुंबईसाठी जनजागृतीवर भर; मुंबई उपनगरचे पालकमंत्री आक्रमक

गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित एका म्युझिक कॉन्सर्टदरम्यान अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने युवा पिढीला बसत असलेला अमली पदार्थांचा विळखा प्रकर्षाने जाणवला. या स्थितीत प्रतिबंधात्मक उपाय आणि युवा पिढीच्या जागरूकतेसाठी १ मे महाराष्ट्र दिनापासून नशामुक्त मुंबईसाठी ‘मुंबई अगेन्स्ट ड्रग्ज’ मोहीम राबवणार येणार आहे.
महाराष्ट्र दिनापासून 'मुंबई अगेन्स्ट ड्रग्ज' मोहीम; नशामुक्त मुंबईसाठी जनजागृतीवर भर; मुंबई उपनगरचे पालकमंत्री आक्रमक
महाराष्ट्र दिनापासून 'मुंबई अगेन्स्ट ड्रग्ज' मोहीम; नशामुक्त मुंबईसाठी जनजागृतीवर भर; मुंबई उपनगरचे पालकमंत्री आक्रमक
Published on

मुंबई : गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित एका म्युझिक कॉन्सर्टदरम्यान अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने युवा पिढीला बसत असलेला अमली पदार्थांचा विळखा प्रकर्षाने जाणवला. या स्थितीत प्रतिबंधात्मक उपाय आणि युवा पिढीच्या जागरूकतेसाठी १ मे महाराष्ट्र दिनापासून नशामुक्त मुंबईसाठी ‘मुंबई अगेन्स्ट ड्रग्ज’ मोहीम राबवणार येणार आहे.

गोरेगाव येथील ड्रग्ज प्रकरणानंतर उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम उपस्थित होते.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय बारकाईने गोरेगाव येथील प्रकरणात लक्ष घालत आहेत. मुंबई पोलीसही आपली भूमिका चोख बजावत असून आयोजक आणि काही अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक करण्यात आली असून त्यांना कडक शासन होईलच, पण या घटना वारंवार घडू नयेत, यासाठी जनजागृती महत्त्वाची आल्यानेच ही बैठक बोलवली असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन १ मे २०२६ ते १ मे २०२७ या कालावधीत ‘मुंबई अगेन्स्ट ड्रग्ज’ ही मोहीम वर्षभर राबवणार असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.

सध्या प्राथमिक तत्त्वावर उपनगरात ही मोहीम राबवली जाणार आहे. त्यानंतर ही मोहीम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात व्यापक स्वरूपात राबवली जाणार आहे. येत्या काही दिवसात वर्षभरातील कार्यक्रमांचा आराखडा निश्चित केला जाईल. तसेच यासंदर्भात एक कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना, गैरसरकारी संस्था अर्थात एनजीओच्या सहकार्याने ही कमिटी समाजात विविध उपक्रम राबवून तरुण पिढीला अमली पदार्थांपासून रोखण्याचे काम करणार आहे.

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम म्हणाले की, “तरुण पिढीला सावरण्यासाठी त्यांच्याच सोशल मीडियाद्वारे जनजागृती झाली पाहिजे. प्रत्येक समिती कक्षेतील शाळा, कॉलेजेस, मोठमोठे हॉटेल आणि मॉल या ठिकाणी जिथे तरुण असतील तिथे जागृती करणारे कार्यक्रम घेतले गेले पाहिजेत. तरुण पिढीला मनोरंजनापासून रोखणे हा पर्याय उचित ठरणार नाही, तर तरुण पिढीला विधायक आणि सुसंस्कृतपणे अमली पदार्थविरहित आनंद घेण्यासाठी समाजाने प्रवृत्त केले पाहिजे. तरुणांकडूनच जेव्हा अमली पदार्थाला ठामपणे नकार देण्यात येईल, तेव्हा आपण ही लढाई जिंकलो, असे म्हणता येईल.”

लोकचळवळ उभारण्याची गरज

मुंबई पोलीस गेल्या १६ महिन्यांपासून ड्रग्जविरोधात कडक मोहीम राबवत आहेत. पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. ही समस्या केवळ पोलिसांच्या कारवाईने सुटणार नसून त्यासाठी लोकचळवळ उभारण्याची गरज असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले. प्रशासनाने कितीही अटकाव करण्याचा प्रयत्न केला तरी काही समाजविघातक प्रवृत्ती समाजात असतात या प्रवृत्तींच्या विरोधात आता सामाजिक संघटनांच्या माध्यमातून लढा उभारला जात आहे, असेही मंत्री लोढा यांनी सांगितले.

समितीत या सदस्यांचा समावेश

नशामुक्ती क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या कमिटीचे अध्यक्ष नियुक्त करण्यात येतील. तसेच महापालिकेचे विद्यमान वॉर्ड अध्यक्ष या कमिटीचे उपाध्यक्ष असतील. सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, स्थानिक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ, शिक्षण अधिकारी अशा १२ सदस्यांची कमिटी असेल. त्याचबरोबर स्थानिक संसद सदस्य, आमदार, नगरसेवक हे लोकप्रतिनिधी या कमिटीचे विशेष निमंत्रित सदस्य असणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in