मुंबईतील वायू प्रदूषण झाले कमी; हवेची गुणवत्ता सुधारली; स्वच्छता मोहिमेचा फायदा, पालिकेची माहिती

मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. याठिकाणी सतत पर्यटकांचा राबता असतो. त्यामुळे या महानगराची प्रतिमा जागतिक पातळीवरही स्वच्छ राहावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सतत प्रयत्नशील असते.
मुंबईतील वायू प्रदूषण झाले कमी; हवेची गुणवत्ता सुधारली; स्वच्छता मोहिमेचा फायदा, पालिकेची माहिती

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेमुळे वायू गुणवत्ता निर्देशांक आता सातत्याने १०० च्या खाली नोंदविला जात आहे. काही भागांमध्ये हा निर्देशांक जवळपास ७० पर्यंत नोंदविण्यात आला आहे. सखोल स्वच्छता मोहिमेत रस्ते स्वच्छ धुतल्याने हवेतील धूलीकण कमी होवून वायू गुणवत्ता सुधारल्याचे समोर आले असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्व प्रशासकीय विभागांमध्ये डिसेंबर २०२३ पासून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. सलग १८ आठवड्यांपासून महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या या मोहिमेमुळे मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी झाले आहे. मुंबईतील वायूप्रदूषण कमी करण्याच्या प्रमुख हेतूने महानगरपालिकेने ही मोहीम सातत्याने राबवली आहे. यामुळे मुंबईतील वायूप्रदूषण कमी झाले असून, नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. याठिकाणी सतत पर्यटकांचा राबता असतो. त्यामुळे या महानगराची प्रतिमा जागतिक पातळीवरही स्वच्छ राहावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सतत प्रयत्नशील असते. मुंबईत स्वच्छतेची जबाबदारी असणाऱ्या स्वच्छता कामगारांच्या माध्यमातूनच मुंबई नगरी स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवण्यासाठी निरनिराळे प्रयत्न सुरू असतात. त्याचाच एक भाग म्हणून सखोल स्वच्छता मोहिमेअंतर्गत प्रत्येक विभागातून एका निवडणूक प्रभागात विभागातील सर्व यंत्रणा एकवटून गत चार महिन्यांपासून स्वच्छता मोहीम राबवित आहे. या प्रकारच्या व्यवस्थेमुळे काही विभागात महिन्यातून एकदा, तर काही विभागात दोन महिन्यातून एकदा सखोल स्वच्छता राबवली जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in