Mumbai : हवेच्या गुणवत्तेची आकडेवारी संकेतस्थळावर प्रदर्शित करा! हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

आपल्या भागातील हवेची गुणवत्ता कशी आहे हे जाणून घेण्याचा नागरिकांना पूर्ण अधिकार आहे. त्याच अनुषंगाने हवेच्या गुणवत्तेची आकडेवारी स्वतंत्र संकेतस्थळावर प्रदर्शित करा, जेणेकरून नागरिक हवेचा दर्जा लक्षात घेऊन स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतील, असे निर्देश उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला दिले.
मुंबई हायकोर्ट
मुंबई हायकोर्ट
Published on

मुंबई : आपल्या भागातील हवेची गुणवत्ता कशी आहे हे जाणून घेण्याचा नागरिकांना पूर्ण अधिकार आहे. त्याच अनुषंगाने हवेच्या गुणवत्तेची आकडेवारी स्वतंत्र संकेतस्थळावर प्रदर्शित करा, जेणेकरून नागरिक हवेचा दर्जा लक्षात घेऊन स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतील, असे निर्देश उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला दिले. संबंधित संकेतस्थळावर प्रदूषण आणि हवेच्या गुणवत्तेची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे, असेही न्यायालयाने सूचित केले.

मुंबई शहर व उपनगरांसह संपूर्ण महानगरातील प्रदूषणाच्या प्रश्नाची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भातील सुमोटो जनहित याचिकेवर मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. 'न्यायालयीन मित्र' म्हणून काम पाहणाऱ्या वकिलांनी प्रदूषणाची परिस्थिती खंडपीठासमोर मांडली.

२५ पैकी १८ दिवस मुंबईची हवा खराब

मुंबईतील खराब हवेच्या प्रश्नाकडे 'न्यायालयीन मित्र' असलेल्या वकिलांनी लक्ष वेधले. जानेवारीच्या सुरुवातीच्या २५ दिवसांपैकी १८ दिवस मुंबईतील हवा खराब दर्जाची होती. प्रदूषणाचा नागरिकांचे मृत्यू तसेच अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे, असा युक्तिवाद वकिलांनी केला. देशात प्रत्येक पाचपैकी एक मृत्यू खराब हवेमुळे होत असल्याचेही त्यांनी निदर्शनाला आणले. आपण मिनी भोपाळमध्ये राहत असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in