मुंबई विमानतळ परिसरातील ७ इमारतींचे पाडकाम; उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फनेल झोनमध्ये नियमांचे उल्लंघन करून बांधलेल्या ७ इमारतींवर पाडकाम कारवाई केल्याची माहिती बुधवारी मुंबई उपनगर जिल्ह्याधिका-यांनी उच्च न्यायालयात दिली. तसे प्रतिज्ञापत्र सादर करून बेकायदा बांधकामांसंदर्भात कारवाईबाबत दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन केल्याचा दावा जिल्हाधिका-यांनी केला आहे.
मुंबई विमानतळ परिसरातील ७ इमारतींचे पाडकाम; उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र
Published on

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फनेल झोनमध्ये नियमांचे उल्लंघन करून बांधलेल्या ७ इमारतींवर पाडकाम कारवाई केल्याची माहिती बुधवारी मुंबई उपनगर जिल्ह्याधिका-यांनी उच्च न्यायालयात दिली. तसे प्रतिज्ञापत्र सादर करून बेकायदा बांधकामांसंदर्भात कारवाईबाबत दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन केल्याचा दावा जिल्हाधिका-यांनी केला आहे.

मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फनेल झोनमध्ये उंचीची मर्यादा न पाळताच अनेक विकासकांनी टोलेजंग इमारती बांधल्या आहेत. या इमारतींमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे, असा दावा करत वकील यशवंत शेणॉय यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

कानउघाडणी...

४८ इमारतींचे बेकायदा बांधकाम तत्काळ पाडणे आवश्यक असल्याचे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने न्यायालयात सांगितले होते. संबंधित इमारतींची माहिती जिल्हाधिकार्यांणना दिल्याचेही विमानतळ प्राधिकरणाने सांगितले होते. त्यानंतरही जिल्हाधिकारी कार्यालय कारवाईबाबत ढिम्म राहिल्याचे निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती.

logo
marathi.freepressjournal.in