Mumbai : विमानात धूम्रपान केल्याप्रकरणी एकास अटक

फुकेत-मुंबई या विमान प्रवासादरम्यान शौचालयात धूम्रपान केल्याप्रकरणी २५ वर्षीय प्रवाशाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : फुकेत-मुंबई या विमान प्रवासादरम्यान शौचालयात धूम्रपान केल्याप्रकरणी २५ वर्षीय प्रवाशाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. शुक्रवारी रात्री फुकेतहून मुंबईकडे येणाऱ्या विमानात शौचालयातून धूर येताना दिसताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली.

दक्षिण मुंबईतील नेपियन्सी रोड येथील रहिवासी भाव्या गौतम जैन याला विमानतळावर उतरल्यावर ताब्यात घेण्यात आले. जैनने विमानाच्या शौचालयात सिगारेट पेटवली होती. त्याच्यावर विमान कायद्यान्वये संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. देशातील विमान वाहतूक नियमांनुसार प्रवासी विमानांमध्ये धूम्रपान करण्यास कडक मनाई आहे.

logo
marathi.freepressjournal.in