17 ऑक्टोंबर रोजी मुंबई विमानतळ राहणार ६ तास बंद ; एकाही विमानाचं उड्डाण होणार नाही

विमानतळ ऑपरेटरने एक निवेदन जारी करत याबाबतची माहिती दिली आहे.
17 ऑक्टोंबर रोजी मुंबई विमानतळ राहणार ६ तास बंद ; एकाही विमानाचं उड्डाण होणार नाही
Published on

मुंबई विमानतळावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रय विमानतळ १७ ऑक्टोबर रोजी ६ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या ६ तासांदरम्यान विमानतळावरुन कोणतही विमानचं उड्डाण होणार नाही.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळवरील दोन रनवे मंळवारी(१७ ऑक्टोबर) रोजी सहा तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. सकाळी ११ वाजेपासून संध्याकाली पाच वाजेदरम्यान विमानांचं उड्डाण बंद ठेवण्यात येणार आहे. विमानतळावरील धावपट्ट्यांच्या देखभालीच्या कामासाठी मंगळवारी ११ ते ५ वाजेदरम्यान विमानांचं उड्डाण होणार नसल्याची माहिती विमानतळ ऑफरेटरने एका निवेदनात दिली आहे.

मुंबई विमानतळावरील दोन्ही धावपट्टींवर देखभाल दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे. विमानतळ ऑपरेटर निवेदनानुसार सांगण्यात आलं आहे की, "छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पावसाळ्यानंतरच्या सर्वसमावेशक धावपट्टी देखभाल योजनेचा एक भाग म्हणून दोन्ही रनवे RWY 09/27 आणि RWY 14/32 हे 17 ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेपासून ते १७.०० वाजेपर्यंत तात्पुरतं नॉन-ऑपरेशनल राहतील." या निवेदनात पुढे म्हटलं आहे की, "'सीएसएमआय'ने सर्व महत्वाच्या विभागांच्या सहकार्यालाने देखभालीचं काम सुरळीत पूर्ण करणं सुनिश्चित करण्यासाठी प्रभावीपणे उड्डाणं निर्धारीत केली आहे. सीएसएमआयएला प्रवाश्यांकडून सहकार्य आणि पाठिंबा अपेक्षित आहे."

logo
marathi.freepressjournal.in