
सुमारे पाच लाख रुपयांच्या ७६०० अमेरिकन डॉलरच्या चोरी झाल्याचा प्रकार मुलुंड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी नवघर पोलिसांनी घरातील तिन्ही मोलकरणीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविला आहे. योगिता दुबळे, भारती शिंगाडे आणि सुचिता दुते अशी या तिघींची नावे असून त्यांच्या तक्रारदार महिलेने चोरीचा संशय व्यक्त केला आहे.
तक्रारदार महिला ही मुलुंड परिसरात राहत असून ती हिंदुस्तान पेट्रोलियम तर तिचे पती मनपामधून निवृत्त झाले आहे. त्यांचा मुलगा जुहूच्या जे. डब्ल्यू मॅरियटमध्ये ऑर्किटेक, तर सून एअर इंडियामधये एअर हवाईसुंदरी म्हणून काम करते. त्यांच्याकडे योगीता पाच, भारती चौदा तर सुचिता ही एक वर्षापासून मोलकरीण म्हणून काम करत होत्या. या तिघींच्या कामाची वेळ सकाळी साडेआठ ते रात्री आठची होती. २१ वर्षांपूर्वी तिचा मुलगा अमेरिकेत शिक्षणासाठी गेला होता. यावेळी त्याने थॉमस कुक ट्रव्हेल्स एजन्सीकडून काही अमेरिकन डॉलर खरेदी केले होते. त्यानंतर त्यांनी थोड थोड करून काही अमेरिकन डॉलर खरेदी करुन त्यांच्या कपाटात ठेवले होते. कधी विदेशात फिरायला गेलो, तर या डॉलरचा वापर करण्याचा त्यांचा विचार होता. गेल्या काही वर्षांत त्यांनी सुमारे पाच लाख रुपयांचे ७६०० अमेरिकन डॉलर जमा केले होते.
गेल्या वर्षी ही महिला तिच्या नागपूर येथील माहेरी गेली होती. काही दिवसांनी ती मुंबईत परत आली. यावेळी तिने कपाटाची पाहणी केली असता तिला पाच लाखांचे ७६०० अमेरिकन डॉलर चोरीस गेल्याचे दिसून आले. याबाबत तिने तिच्या पतीसह मुलगा आणि सूनेला विचारले असता त्यांना डॉलरविषयी काहीच माहिती नव्हती. त्यामुळे तिने तिन्ही मोलकरणीकडे विचारणा केली. मात्र त्यांनीही याबाबत काहीच माहित नसल्याचे सांगून तिला टाळण्याचा प्रयत्न केला. डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत ते अमेरिकन डॉलर चोरीस गेले होते. या चोरीमागे योगिता, भारतीय अणि सुचिता यांचाच सहभाग असण्याची शक्यता वर्तवून तिने नवघर पोलिसात या तिघींविरुद्ध तक्रार केली आहे.