मुंबई आणि दिल्ली विमानतळावर बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी ; पाँडेचेरीतून एकाला अटक

मुंबई आणि दिल्ली विमानतळावर बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी ; पाँडेचेरीतून एकाला अटक

मुंबई पोलीसांच्या नियंत्रण कक्षाला शनिवारी दुपारच्या सुमारास मुंबई आणि दिल्ली विमानतळावर बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीचा फोन आला होता.

मुंबई आणि दिल्ली विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी एका १९ वर्षाच्या तरुणाला पाँडीचेरीतून अटक करण्यात आली आहे. याआरोपीने अशी धमकी का दिली याबाबत अद्याप माहिती मिळाली नसून पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.

मुंबई पोलीसांच्या नियंत्रण कक्षाला शनिवारी दुपारच्या सुमारास मुंबई आणि दिल्ली विमानतळावर बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीचा फोन आला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. कंट्रोल रुमला फोन करत विमानतळ परिसरात बॉम्बस्फोट होऊन मोठी दुर्घटना होणार असल्याची माहिती या आरोपीने दिली होती.

यानंतर पोलिसांकडून दोन्ही विमानतळांचा शोध घेण्यात आला होता. मात्र, काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही. यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात सहार पोलीस ठाण्यात कलम ५०६(२) आणि कलम ५०५ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. यानंतर सहान पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाचा तपास सुरु केला. यानंतर आरोपी पॉडीचेरीचा असल्याचं समोर आलं.

यानंतर पोलिसांनी पॉडिचेरीला आपलं एक पथक रवाना करुन तेथील स्थानिक पोलिसांची मदत घेतली आणि धमकीचा फोन करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या आरोपीला सध्या पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in