Mumbai Art Fair 2024: मुंबईत सुरु झाला आहे सर्वात मोठा आर्ट फेस्टिव्हल, जाणून घ्या कशी आणि कुठे भेट देता येईल!

Weekend Art Festival in Mumbai: ३ मे ते ५ मे २०२४ या कालावधीत मुंबई आर्ट फेअर २०२४ होणार आहे. या शहरात भव्य फेस्टिव्हलबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
 Bookmyshow
Bookmyshow

India Art Festival: आर्ट आवडणाऱ्यांसाठी मुंबईतील सर्वात मोठा आर्ट कार्निव्हल सज्ज झाला आहे. इंडिया आर्ट फेस्टिव्हल ३ मे ते ५ मे २०२४ या कालावधीत सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत मुंबई आर्ट फेअर २०२४ असणार आहे. हा फेस्टिव्हल मुंबईच्या नेहरू सेंटर, वरळी येथे आयोजित केला गेला आहे. यामध्ये तुम्हाला सुंदर कला, वास्तुकला, कलाकार आणि कला संस्कृती बघता आणि अनुभवता येणार आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार, या फेस्टिव्हलमध्ये ३०० कलाकार आणि देशभरातील ३००० हून अधिक चित्रांचे प्रदर्शन असणार आहे. यासोबतच या फेस्टिव्हलमध्ये दरम्यान कला आणि संगीत यांचा मिलाफ करून 'फ्यूजन शो' दाखवला जाणार आहे.

मोठमोठ्या कलाकारांचे होणार सादरीकरण

पहिल्या दिवशी, कलाकार प्रकाश बाळ जोशी हे बासरीवादक गिरीश कुलकर्णी यांच्या सुरात आपली चित्रकला दाखवतील. फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी प्रा.सुरेंद्र जगताप यांची चित्रकला आणि अजिंक्य मोरे यांच्या जलतरंग गायनाचे सादरीकरण होणार आहे. कलाकार गौतम दास यांच्या लाइव्ह पेंटिंग आणि जमीनाली खान यांच्या सादरीकरणाने या भव्य महोत्सवाची सांगता होईल. या प्रदर्शनात श्रुती चालानी, रश्मी पोटे, समता गाला, राखी सरमाह, स्टेला फर्नांडिस, अनवी चावला आणि पल्लवी सिंग यांसारख्या कलाकारांची कामे बघायला मिळतील. याव्यतिरिक्त, शिल्पकार रोहन सोनवणे आणि सौमेन कार त्यांच्या अद्वितीय धातूच्या निर्मितीचे प्रदर्शन करतील.

मुंबई आर्ट फेअरचे संचालक श्री राजेंद्र पाटील म्हणाले, "हा फेस्टिवल सुरू झाल्यापासूनच तो उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना त्यांचे कार्य प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांचे नेटवर्क वाढवण्यासाठी समर्पित करण्यात आहे. या वर्षी, भारतातील ३०० कलाकारांसह तरुण कलाकृतींना पाठिंबा देण्याची परंपरा या महोत्सवाने सुरू ठेवली आहे. ज्यात समुद्रातील दृश्ये, लँडस्केप्स, ग्रामीण आणि शहरी विभाग, पोर्ट्रेट, वन्यजीव कला आणि अमूर्त कलाकृतींचा समावेश आहे"

कुठे काय बघायला मिळणार?

डिस्कव्हरी ऑफ इंडिया बिल्डिंगच्या तळमजल्यावर विविध कलात्मक अभिव्यक्ती प्रदर्शित करण्यासाठी ७५ वातानुकूलित बूथ तयार करण्यात आले आहेत. बियॉन्ड द कॅनव्हास, बुके ऑफ आर्ट गॅलरी, देव मेहता आर्ट गॅलरी, स्टुडिओ ३ आर्ट गॅलरी आणि मुंबईतील ग्रेस्केल, तसेच आर्टिशियस गॅलरी, ऑरा प्लॅनेट, दिल्लीतील मेराकी आर्ट हाऊस आणि कोलकाता येथील अर्पितम कला मंदिर यासारख्या विविध गॅलरी सहभागी होणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in