Mumbai : प्रत्येक निर्णयासाठी परवानगीची गरज नाही; अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) प्रवेश घेण्याचा निर्णय मी आई-वडिलांपासून लपवून ठेवला.
Mumbai : प्रत्येक निर्णयासाठी परवानगीची गरज नाही; अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा विद्यार्थ्यांना सल्ला
Mumbai : प्रत्येक निर्णयासाठी परवानगीची गरज नाही; अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा विद्यार्थ्यांना सल्लाPhoto - Salman Ansari
Published on: 

मनोज रामकृष्णन

मुंबई : ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) प्रवेश घेण्याचा निर्णय मी आई-वडिलांपासून लपवून ठेवला. मला एनडीएत जायचे आहे, असे मी आई-वडिलांना सांगितले असते, तर त्यांनी मला परीक्षेसाठी अर्जच करू दिला नसता. आयुष्यात प्रत्येक निर्णयासाठी परवानगी घेण्याची गरज नसते,’ असा सल्ला अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी विद्यार्थ्यांना दिला. यशासाठी कोणताही खास मंत्र नसून चिकाटी महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Photo - Salman Ansari

भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे गुरुवारी मुंबई पुस्तक महोत्सवात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील मैदानावर उभारलेल्या भव्य मंचावर ‘मीट युवर सुपरहिरो’ या सत्रासाठी शुभांशू शुक्ला दाखल होताच विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत छायाचित्रे काढण्यासाठी गर्दी केली. शून्य गुरुत्वाकर्षण, अंतराळयानाचे इंजिन आणि आपल्या करिअरच्या निवडीला आई-वडिलांची संमती होती का, अशा विविध प्रश्नांची सरबत्ती विद्यार्थ्यांनी केली.

पृथ्वीवर परतताना त्यांच्या मनात नेमके काय विचार होते, असा प्रश्न एका विद्यार्थ्याने विचारला. त्यावर शुक्ला यांनी अंतराळातून पृथ्वीचे निरीक्षण करणे विलक्षण होते; मात्र मोहिमेवर लक्ष केंद्रित असल्याने अन्य गोष्टींचा विचार करण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)