जावयावर सासऱ्याचा जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा

पत्नी प्रज्ञा ही मोबाईलवर कोणाशी तरी बोलत जात असल्याचे पती प्रदीप बबन जाधव याच्या निदर्शनास आले. यावेळी तो तिच्या मागून चालत होता. काही वेळानंतर त्याने तिचा मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला; मात्र...
जावयावर सासऱ्याचा जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा

मुंबई : कौटुंबिक वादातून जावयावर सासऱ्यासह त्याच्या तीन मित्रांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना गोवंडी परिसरात घडली. या हल्ल्यात प्रदीप बबन जाधव हा जावई गंभीररीत्या जखमी झाला असून, त्याच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सासऱ्यासह चौघांविरुद्ध गोवंडी पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरू केला आहे.

प्रदीप बबन जाधव हा गोवंडीतील सम्राट अशोकनगर रेल्वे पटरीजवळील आठवले चाळीत राहत असून, तो कुलाबा बस डेपोमध्ये इलेक्ट्रिक विभागात कामाला आहे. २०१८ साली त्याचे प्रज्ञा या महिलेसोबत विवाह झाला होता. मात्र गेल्या दहा महिन्यांपासून ते दोघेही वेगळे राहत आहे. मंगळवारी २७ फेब्रुवारीला तो त्याच्या पत्नीच्या लोअर परेल येथील कामाजवळ गेला होता. यावेळी त्याची पत्नी प्रज्ञा ही मोबाईलवर कोणाशी तरी बोलत जात असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. यावेळी तो तिच्या मागून चालत होता. काही वेळानंतर त्याने तिचा मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला; मात्र मोबाईल बॅगेत ठेवून ती तेथून निघून गेली. त्यामुळे प्रदीप हा त्याच्या घरी निघून आला. रात्री साडेनऊ वाजता तो सम्राट अशोकनगर येथील मोकळ्या मैदानात बसला होता. यावेळी तिथे त्याचे सासरे मनोज पाटील व त्याचे तीन मित्र आले होते. या चौघांनीही प्रदीपला लोखंडी रॉड, पेव्हर ब्लॉक आणि दगडाने बेदम मारहाण केली. यावेळी मनोजने त्याच्या मुलीला मारतोस काय, तुझा आता मुडदाच पाडतो, अशी धमकी देत शिवीगाळ करून मारहाण सुरू केली होती. या मारहाणीत प्रदीपच्या डोक्याला, छातीला, पाठीला, दोन्ही हातांना आणि पायांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तो रक्तबंबाळ झाला होता. मारहाणीनंतर मनोज पाटीलसह इतर तिघेही तेथून पळून गेले. रक्तबंबाळ झालेल्या प्रदीपला नंतर स्थानिक रहिवाशांनी तातडीने शीव रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही माहिती मिळताच गोवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी प्रदीप जाधवची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती.

logo
marathi.freepressjournal.in