मुंबईत ऑगस्टमध्ये ६६ टक्के कमी पाऊस; ३५ वर्षांतील नीचांक

मुंबईत गेल्या दोन महिन्यांत हवामानाची तीव्र विषमता पाहायला मिळाली. जुलै महिन्यात १,१७६.५ मिमी इतका विक्रमी पाऊस नोंदवल्यानंतर, ऑगस्ट महिन्यात कुलाबा वेधशाळेत अवघा १६४.५ मिमी पाऊस पडला आहे. गेल्या ३५ वर्षांत प्रथमच ऑगस्ट महिन्यात इतका कमी पाऊस झाला आहे.
मुंबईत ऑगस्टमध्ये  ६६ टक्के कमी पाऊस; ३५ वर्षांतील नीचांक
मुंबईत ऑगस्टमध्ये ६६ टक्के कमी पाऊस; ३५ वर्षांतील नीचांकप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

देवश्री भुजबळ/मुंबई :

मुंबईत गेल्या दोन महिन्यांत हवामानाची तीव्र विषमता पाहायला मिळाली. जुलै महिन्यात १,१७६.५ मिमी इतका विक्रमी पाऊस नोंदवल्यानंतर, ऑगस्ट महिन्यात कुलाबा वेधशाळेत अवघा १६४.५ मिमी पाऊस पडला आहे. गेल्या ३५ वर्षांत प्रथमच ऑगस्ट महिन्यात इतका कमी पाऊस झाला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या जिल्हानिहाय मासिक अहवालानुसार, १ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मुंबई शहर जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ६६ टक्के कमी, तर मुंबई उपनगरांमध्ये ४४ टक्के कमी पाऊस नोंदवला गेला आहे.

कोकण (मुंबईसह) सरासरीपेक्षा ३३ टक्के कमी, मध्य महाराष्ट्र: सरासरीपेक्षा ३१टक्के कमी, विदर्भ: सरासरीपेक्षा ५८टक्के कमी, मराठवाडा: सरासरीपेक्षा ६९टक्के कमी, महाराष्ट्र (एकूण): सरासरीपेक्षा ४४टक्के कमी पाऊस. हवामान विभागाने २०२६ च्या मान्सूनसाठी सुरुवातीलाच सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला होता. परंतु मान्सूनच्या सुरुवातीला जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला, ज्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी ओढ दिली.

मुंबईत दहा टक्के पाणीकपात कायम

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत ४ सप्टेंबर रोजी ९५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे १५ मे पासून लागू करण्यात आलेली १० टक्के पाणी कपात कायम राहणार आहे. पाणीपुरवठ्याबाबत येणाऱ्या तक्रारींची कार्यालयात बसून कागदोपत्री सोडवणूक न करता संबंधित अधिकारी व अभियंत्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी जाऊन समस्येच्या मुळाशी जावे आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in