बेकरीचालकांकडे स्वच्छ इंधन वापरासाठी उरले १५ दिवस; आदेश न पाळणाऱ्या बेकरी व्यावसायिकांसाठी काम थांबवण्याचा इशारा

मुदत संपेपर्यंत स्वच्छ इंधनाचा वापर न केल्यास त्यांना काम थांबवण्याची नोटीस बजावण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
बेकरीचालकांकडे स्वच्छ इंधन वापरासाठी उरले १५ दिवस; आदेश न पाळणाऱ्या बेकरी व्यावसायिकांसाठी काम थांबवण्याचा इशारा
Pinterest (DeepakAmembal)
Published on

पूनम पोळ / मुंबई

मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणास लाकूड, कोळसा याचा इंधन म्हणून उपयोग करणाऱ्या बेकरी, हॉटेल, उपाहारगृह, खुल्यावर खाद्यपदार्थ विकणारे व्यावसायिक हे कारणीभूत ठरत आहेत. यासंदर्भात उच्च न्यायालयाने ९ जानेवारी २०२५ रोजी घेतलेल्या सुनावणीत सहा महिन्यांच्या मुदतीत म्हणजेच ८ जुलैपर्यंत लाकूड व कोळसा इंधनावर आधारित व्यावसायिकांना पर्यायी स्वच्छ इंधनाचा अवलंब करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिकेने ३५६ जणांना नोटीस बजावली होती. त्यापैकी ४८ बेकरीचालकांनी स्वच्छ इंधनाचा अवलंब केला आहे. उर्वरीत बेकरीचालकानी मुदत संपेपर्यंत स्वच्छ इंधनाचा वापर न केल्यास त्यांना काम थांबवण्याची नोटीस बजावण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबईत दिवसेंदिवस वायू प्रदूषणात वाढ होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी सर्वच स्तरातून सर्वोतपरी प्रयत्न सुरू आहेत. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर धुळीप्रमाणेच हवेमध्ये इतरही धोकादायक घटक आढळून येतात.

logo
marathi.freepressjournal.in