प्रेमप्रकरणातून आईकडून मुलीचा गळा आवळून खून; पोलिसांनी केली अटक

प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून एका महिलेने तिच्याच १९ वर्षांच्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याची घटना वांद्रे परिसरात...
प्रेमप्रकरणातून आईकडून मुलीचा गळा आवळून खून; पोलिसांनी केली अटक

मुंबई : प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून एका महिलेने तिच्याच १९ वर्षांच्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याची घटना वांद्रे परिसरात उघडकीस आली आहे. भूमिका उमेश बागडी असे मृत मुलीचे नाव असून, तिच्या हत्येप्रकरणी तिची आई टिना उमेश बागडी हिला निर्मलनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर तिला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना सोमवारी मध्यरात्री तीन वाजता वांद्रे येथील नथू गणपत चाळ, प्लॉट क्रमांक ८०, शीतला माता परिसरा घडली. याच परिसरात टिना ही तिच्या मुलांसोबत राहत होती. भूमिका ही तिची मुलगी असून, ती सध्या वांद्रे येथील चेतना महाविद्यालयात शिकत होती. तिचे एका तरुणासोबत प्रेम होते. या प्रेमकरणाची माहिती समजताच भूमिका आणि टिना यांच्यात सतत खटके उडत होते. भूमिकाच्या प्रेमसंबंधाला तिचा विरोध असल्याने तिने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र ती ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. सोमवारी पहाटे तीन वाजता त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. यावेळी रागाच्या भरात भूमिकाने टिनाच्या हाताचा चावा घेतला. त्यात तिला दुखापत झाली होती. त्यामुळे तिनेही रागाच्या भरात तिची गळा आवळून हत्या केली. बेशुद्ध झालेल्या भूमिकाला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करणयात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in