Mumbai : वांद्रे टर्मिनसवर ७५ दिवसांचा ब्लॉक

वांद्रे टर्मिनस स्थानकातील फलाट क्रमांक पाचच्या पुनर्बाधणीसाठी पश्चिम रेल्वेकडून ७५ दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. १ डिसेंबर २०२६ ते १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत फलाटावरील सिमेंट काँक्रीटच्या आवरणाची दुरुस्ती आणि पुनर्बाधणी केली जाणार आहे.
Mumbai : वांद्रे टर्मिनसवर ७५ दिवसांचा ब्लॉक
Published on: 

मुंबई : वांद्रे टर्मिनस स्थानकातील फलाट क्रमांक पाचच्या पुनर्बाधणीसाठी पश्चिम रेल्वेकडून ७५ दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. १ डिसेंबर २०२६ ते १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत फलाटावरील सिमेंट काँक्रीटच्या आवरणाची दुरुस्ती आणि पुनर्बाधणी केली जाणार आहे. या कामामुळे लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या प्रारंभिक आणि अंतिम स्थानकांमध्ये बदल करण्यात आला आहे. काही गाड्या दादर, तर काही बोरिवली स्थानकातून सोडण्यात येणार आहेत. याशिवाय पश्चिम रेल्वेच्या चार उपनगरीय लोकल फेऱ्याही या कालावधीत रद्द राहणार आहेत.

Mumbai : वांद्रे टर्मिनसवर ७५ दिवसांचा ब्लॉक
Mumbai : लोकल प्रवाशांची गैरसोय होणार! मध्य रेल्वेसह ट्रान्स हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवरही दुरुस्तीची कामे, वाचा सविस्तर

वांद्रे टर्मिनसच्या फलाट क्रमांक पाचवरून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक केली जाते. या फलाटाच्या काँक्रीट आवरणाची दुरुस्ती व पुनर्बाधणी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ब्लॉकचे नियोजन केले आहे. या कालावधीत वाहतुकीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी काही गाड्यांची स्थानके बदलणार आहेत. यानुसार, भुज-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेसचा प्रवास दादरमध्ये संपणार असून परतीच्या प्रवासासाठी ही गाडी दादरहून सुटेल.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)