मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार

मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना  शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार
Published on

दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. भांडूप पश्चिमेला लाला शेठ कंपाऊंड येथील अशोक केदारे चौकाजवळ आयोजक दिना बामा पाटील प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा आणि माजी खासदार संजय पाटील यांच्या आयोजनाखाली शनिवारपासून होत असलेल्या मुंबई क्लासिक २०२२ स्पर्धेत महाराष्ट्रातील दीडशेपेक्षा अधिक खेळाडूंमध्ये द्वंद्व रंगलेले पाहायला मिळणार आहे.

विशेष म्हणजे जुलै महिन्यात मालदीव येथे होत असलेल्या आशियाई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी येत्या २२ मे रोजी हिमाचल प्रदेशात भारतीय संघाची निवडी चाचणी घेतली जाणार आहे. या चाचणीसाठी महाराष्ट्रातील दिग्गजांची निवड याच स्पर्धेत केली जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in