Mumbai : चालकाच्या निष्काळजीपणामुळे बेस्ट बसने पादचाऱ्यांना उडवले; दोन प्रवासी गंभीर

बस सुरूच ठेवून चालक वॉशरूमला निघून गेल्यामुळे अनियंत्रित बसने दोन पादचाऱ्यांना उडवले. यात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
Mumbai : चालकाच्या निष्काळजीपणामुळे बेस्ट बसने पादचाऱ्यांना उडवले; दोन प्रवासी गंभीर
Published on

मुंबई : विक्रोळी कन्नमवार नगर येथे बेस्ट बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे शनिवारी अपघात झाला. बस सुरूच ठेवून चालक वॉशरूमला निघून गेल्यामुळे अनियंत्रित बसने दोन पादचाऱ्यांना उडवले. यात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

शनिवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास कन्नमवार नगर बेस्ट बस डेपो येथे बस सुरूच ठेवून चालक संतोष देऊलकर (५५) हा नियंत्रण कक्षात गेला. त्यावेळी बस अचानक सुरू होऊन पुढे गेली. या बसने चहाच्या टपरीला धडक देत दोघा जणांना उडवले. यात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. कन्नमवार नगर बेस्ट बस डेपोचा परिसर हा अत्यंत वर्दळीचा आहे. येथून जवळच दोन महाविद्यालयेही आहेत. अशातच बसचालकाने निष्काळजीपणे बस सुरूच ठेवली आणि तो डेपोतील नियंत्रण कक्षातील स्वच्छतागृहात निघून गेला.

दुसरीकडे, सुरू असलेली बस अचानक पुढे जाऊ लागली. डेपोच्या बाहेरील टी स्टॉलला ती धडकली. इथे दोन कामगार उभे होते. त्यांनाही बसने धडक दिली. यात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, बसचालकाला विक्रोळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा अपघात कसा घडला, कारणे काय, याबाबत पोलीस त्याच्याकडे चौकशी करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in