मुंबईकरांच्या खिशाला कात्री! आजपासून BEST प्रवास महागला, तिकीटासाठी दुप्पट पैसे, 'हाफ तिकीट'ही पुन्हा सुरू, जाणून घ्या नवीन दर

बेस्ट बसच्या तिकीट दरात आजपासून (शुक्रवार, ९ मे) दुप्पटीने वाढ झाली आहे. एसी आणि नॉन एसी बसच्या तिकीटांसोबतच दैनंदिन आणि मासिक पाससाठीही जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे लहानग्यांसाठी हाफ तिकीट पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : बेस्ट बसच्या तिकीट दरात आजपासून (शुक्रवार, ९ मे) वाढ झाली आहे. साध्या बसचे तिकीट पहिल्या पाच किलोमीटर अंतरासाठी १० रुपये तर वातानुकूलित बससाठी पहिल्या पाच किमीमीटर अंतरासाठी १२ रुपये झाले आहे. म्हणजेच तिकीट दरात दुप्पट वाढ झाली आहे. बेस्ट बसचा दिवसभराचा पाससाठी आता ६० रुपयांऐवजी ७५ रुपये मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे लहानग्यांसाठी हाफ तिकीट पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

दैनंदिन पास

गेली काही वर्षे बेस्ट उपक्रमाची आर्थिक कोंडी वाढतच आहे. उपक्रमाचा आर्थिक गाडा हाकण्यासाठी बेस्टने मुंबई मनपाकडे आर्थिक मदतीची मागणी केली. त्यामुळे मुंबई मनपाने गेल्या १० वर्षांत ११ हजार कोटी रुपये बेस्टला दिले. तरीही बेस्ट उपक्रमाची आर्थिक कोंडी फुटत नसल्याने तिकीट दरात वाढ करण्यास मुंबई महापालिका प्रशासनाने अखेर मंजुरी दिली. त्यानंतर विभागीय वाहतूक प्राधिकरणानेही तिकीट दरवाढीला मंजुरी दिल्याने बेस्ट बसचा प्रवास शुक्रवारपासून महाग झाला आहे.

विना वातानुकूलित बसेसचे नवे भाडे:

  • ५ किमी अंतरासाठी सध्याचे भाडे ५ रुपये, नवीन भाडे १० रुपये

  • १० किमी अंतरासाठी सध्याचे भाडे १० रुपये, नवीन भाडे १५ रुपये

  • १५ किमी अंतरासाठी सध्याचे भाडे १५ रुपये, नवीन भाडे २० रुपये

  • २० किमी अंतरासाठी सध्याचे भाडे २० रुपये, नवीन भाडे ३० रुपये

  • २५ किमी अंतरासाठी सध्याचे भाडे २० रुपये, नवीन भाडे ३५ रुपये

  • पुढे प्रत्येक ५ किमी अंतरासाठी ५ रुपये वाढ असणार आहे.

वातानुकूलित बसेसचे नवे भाडे:

  • ५ किमी अंतरासाठी सध्याचे भाडे ६ रुपये, नवीन भाडे १२ रुपये

  • १० किमी अंतरासाठी सध्याचे भाडे १३ रुपये, नवीन भाडे २० रुपये

  • १५ किमी अंतरासाठी सध्याचे भाडे १९ रुपये, नवीन भाडे ३० रुपये

  • २० किमी अंतरासाठी सध्याचे भाडे २५ रुपये, नवीन भाडे ३५ रुपये

  • २५ किमी अंतरासाठी सध्याचे भाडे २५ रुपये, नवीन भाडे ४० रुपये

  • पुढे प्रत्येक ५ किमी अंतरासाठी ५ रुपये वाढ असणार आहे.

-दैनंदिन पास : अमर्याद - ७५ रुपये

-३० दिवसांचा पास : ९०० ऐवजी १,८०० रुपये

टोल नाक्यावर २ रुपये अतिरिक्त प्रवास भाडे

टोल नाक्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून विनावातानुकूलित आणि वातानुकूलित बस सेवांवर २ रुपये अतिरिक्त प्रवास भाडे आकारण्यात येईल.

ज्येष्ठांसाठी बसपास

ज्येष्ठ नागरिकांसाठी ६०, ९० व १२० बसफेऱ्यांसाठी मासिक बसपास आहे. यात ज्येष्ठांना ५० रुपये सवलत देण्यात येईल.

हाफ तिकीट पुन्हा सुरू

५ ते १२ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी हाफ तिकीट पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

दिव्यांग प्रवाशांना दिलासा

अंध, ४० टक्के व त्यापेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या दिव्यांग प्रवाशांना उपक्रमाच्या बसगाड्यांमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येते. ती कायम ठेवली आहे. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी बेस्ट उपक्रमाचे ‘चलो स्मार्ट कार्ड’, मोबाईल ॲप ओळखपत्र घेणे बंधनकारक आहे.

logo
marathi.freepressjournal.in