Mumbai : बोरिवलीत बेस्ट बस दुभाजकावर धडकली; मोठा अनर्थ टळला, जीवितहानी नाही

बोरिवली (पूर्व) येथील दौलतनगर बसथांब्याजवळ सोमवारी रात्री ११.२० वाजण्याच्या सुमारास बेस्टच्या भाडेतत्त्वावरील बसचा अपघात झाला.
Mumbai : बोरिवलीत बेस्ट बस दुभाजकावर धडकली; मोठा अनर्थ टळला, जीवितहानी नाही
Mumbai : बोरिवलीत बेस्ट बस दुभाजकावर धडकली; मोठा अनर्थ टळला, जीवितहानी नाही(Photo-X)
Published on

मुंबई : बोरिवली (पूर्व) येथील दौलतनगर बसथांब्याजवळ सोमवारी रात्री ११.२० वाजण्याच्या सुमारास बेस्टच्या भाडेतत्त्वावरील बसचा अपघात झाला. अज्ञात दुचाकीस्वार अचानक बससमोर आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने बस उजव्या बाजूला वळवली. त्यामुळे बस दुभाजकावर धडकली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा प्रवासी जखमी झाल्याची नोंद नाही.

बेस्ट प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवारी २० जुलै रोजी रात्री ११.२० वाजता घडला. मागाठाणे आगारातील ए-४६२/३४ मार्गावरील बस क्रमांक ७४९८ ही बस वैशालीनगर येथून बोरिवली पूर्वेकडे जात होती. दौलतनगर बसथांब्याजवळ डाव्या बाजूने एक अज्ञात दुचाकीस्वार अचानक बससमोर आला. त्याला धडक बसू नये म्हणून चालकाने क्षणार्धात बस उजव्या बाजूला वळवली. मात्र, त्यामुळे बस रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन धडकली.

घटनेची माहिती मिळताच टोइंग व्हॅन घटनास्थळी दाखल झाली. बस दुभाजकावरून हटवून मागाठाणे आगारात आणण्यात आली. या प्रकरणी अद्याप कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. पोलीस उपनिरीक्षकांनी बसचालक व वाहकाची माहिती नोंदवून घेतली असून, आवश्यकतेनुसार चौकशीसाठी बोलावले जाईल, असे सांगितले आहे. अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in