Mumbai : ब्रेक, स्टेअरिंग नीट हाताळा! दुचाकीस्वारांना क्रॉस करू नका! सुमारे ७ हजारांहून अधिक चालकांचे 'बेस्ट काऊन्सलिंग'

हँड ब्रेक, क्लच अन् स्टेअरिंग हाताळताना दक्षता घ्यावी. मुंबई शहरातील रस्त्यांवर बेस्ट बसचा स्पीड लिमिटेडच ठेवा तसेच बस डेपोच्या बाहेर काढताना योग्य ती तपासणी करून द्यावी तसेच रस्त्यांवर दुचाकी जात असेल तर ओव्हरटेक करू नका, अशा प्रकारचे बेस्ट उपक्रमातील सुमारे ७ हजारांहून अधिक चालकांचे समुपदेशन करण्यात येत असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.
Mumbai : ब्रेक, स्टेअरिंग नीट हाताळा! दुचाकीस्वारांना क्रॉस करू नका! सुमारे ७ हजारांहून अधिक चालकांचे 'बेस्ट काऊन्सलिंग'
Mumbai : ब्रेक, स्टेअरिंग नीट हाताळा! दुचाकीस्वारांना क्रॉस करू नका! सुमारे ७ हजारांहून अधिक चालकांचे 'बेस्ट काऊन्सलिंग''एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : हँड ब्रेक, क्लच अन् स्टेअरिंग हाताळताना दक्षता घ्यावी. मुंबई शहरातील रस्त्यांवर बेस्ट बसचा स्पीड लिमिटेडच ठेवा तसेच बस डेपोच्या बाहेर काढताना योग्य ती तपासणी करून द्यावी तसेच रस्त्यांवर दुचाकी जात असेल तर ओव्हरटेक करू नका, अशा प्रकारचे बेस्ट उपक्रमातील सुमारे ७ हजारांहून अधिक चालकांचे समुपदेशन करण्यात येत असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

कुर्ला, भांडुप, दादर, कांदिवली येथे बेस्ट बसेसचे अपघात झाले. विशेष म्हणजे हे सगळे अपघात भाडेतत्त्वावरील बसेसचे झाल्याने भाडेतत्त्वावरील बसेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंबईकरांची दुसरी लाइफलाइन म्हणून बेस्ट बसची जगभरात ओळख आहे. बेस्ट बसचे सद्यस्थितीत २५ लाख प्रवासी बेस्ट बसेसना पसंती देतात.

बेस्ट बस तीन शिफ्टमध्ये चालवल्या जातात. एका बसवर तीन चालक सेवा देतात. प्रति तास ६० किमी वेगमर्यादा असून सात हजार चालकांचे अपघात टाळण्यासाठी समुपदेशन केले जात आहे, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

वाहनचालक, पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न

बेस्टच्या मालकीच्या व भाडेतत्त्वावरील वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस व विना वातानुकूलित अशा २ हजार ७०० बसेस आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत बेस्ट बसेसच्या विशेष करून भाडेतत्त्वावरील बसेसच्या अपघातात वाढ झाली आहे. त्यामुळे दुचाकी व पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कंत्राटी व स्वमालकीच्या बसेसवर सुमारे ७ हजार चालक कार्यरत असून त्यांना दिंडोशीत महिनाभर प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर अपघात टाळण्यासाठी समुपदेशन केले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in