Mumbai : बेस्टच्या तीन मार्गांवर तिकीटासाठी UPI चा वापर

बेस्ट बसमधील तिकीट खरेदीची पद्धत बदलण्याच्या दृष्टीने बेस्ट उपक्रमाने डिजिटल पेमेंटचा पर्याय पुढे आणला आहे.
Mumbai : बेस्टच्या तीन मार्गांवर तिकीटासाठी UPI चा वापर
Mumbai : बेस्टच्या तीन मार्गांवर तिकीटासाठी UPI चा वापर'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

मुंबई : बेस्ट बसमधील तिकीट खरेदीची पद्धत बदलण्याच्या दृष्टीने बेस्ट उपक्रमाने डिजिटल पेमेंटचा पर्याय पुढे आणला आहे. प्रवाशांना आता यूपीआयच्या माध्यमातून तिकीटाचे पैसे भरता येणार आहेत. यासाठी सुरुवातीला तीन बसमार्गांवर या सुविधेची प्रायोगिक चाचणी हाती घेण्यात आली आहे. या प्रयोगामुळे रोख व्यवहारांवरील अवलंबित्व कमी होण्याबरोबरच तिकीट खरेदीची प्रक्रिया अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

बेस्टने या उपक्रमासाठी एसी-७००, एसी-७२ आणि ए-८४ या बसमार्गांची निवड केली आहे. एसी-७०० बस मागाठाणे आगार ते ठाणे रेल्वे स्थानक (पूर्व) या मार्गावर धावते. एसी-७२ ही बस राणी लक्ष्मी चौक ते भाईंदर रेल्वे स्थानक (पूर्व) अशी सेवा देते. तर ए-८४ ही बस ओशिवरा आगार ते एस. पी. एम. चौकदरम्यान कोस्टल रोडवरून धावते.

बसमधून प्रवास करताना प्रवाशांना तिकीटासाठी रोख रक्कम द्यावी लागते. सुट्टे पैसे नसल्यास प्रवासी आणि वाहक दोघांनाही अडचणींचा सामना करावा लागतो.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)