Mumbai : सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करा; बेस्ट समितीत BJPची मागणी

बेस्ट उपक्रमातील अनेक कर्मचारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती लक्षात घेता, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देणे अशक्य होणार आहे.
Mumbai : सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करा; बेस्ट समितीत BJPची मागणी
Mumbai : सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करा; बेस्ट समितीत BJPची मागणी 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : बेस्ट उपक्रमातील अनेक कर्मचारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती लक्षात घेता, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देणे अशक्य होणार आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त वय ५८ वरून ६० करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक सुनील गणाचार्य यांनी मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत केली. दरम्यान, नगरविकास विभागाकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवावा आणि अहवाल सादर करण्यात यावा, असे निर्देश बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी बेस्ट उपक्रमाला दिले.

Mumbai : सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करा; बेस्ट समितीत BJPची मागणी
Mumbai : बेस्टला आर्थिक बळाची गरज; महाव्यवस्थापकांचे पालिका आयुक्तांना निवेदन; एकरकमी ४ हजार कोटी देण्याची मागणी

गेल्या काही वर्षात बेस्टची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक झाली असून निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देणे अशक्य झाले आहे. बेस्ट उपक्रमास पूर्वीची उर्जित अवस्था आणण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांची गरज आहे. वाहतूक विभाग विद्युत पुरवठा विभागासह अन्य प्रशासकीय विभागातील अनेक उच्च पदस्थ अधिकारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे उपक्रमातील कामकाज ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. त्यात गेल्या पाच वर्षांत उपक्रमातील महाव्यवस्थापक पदावर ६ भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी कामे केले, पण त्यांनी आपली दुसऱ्या ठिकाणी वर्णी लावून घेतली व पूर्णवेळ अधिकारी न मिळाल्यामुळे बेस्ट उपक्रम अधोगतीच्या मार्गावर चालू लागला आहे.

यासाठी बेस्ट उपक्रमास अनुभवी, बेस्टशी बांधिलकी मानणारा, बेस्टला यापूर्वी आपल्या कर्तव्यदक्ष कामामुळे नामवंत सार्वजनिक उपक्रम म्हणून ओळख निर्माण करण्यात हातभार लावणारा अधिकारी, कर्मचारी, व निष्ठावंत कामगारांची आवश्यकता आहे.

logo
marathi.freepressjournal.in