Mumbai : भांडुपमध्ये घराचा भाग कोसळून वृद्धाचा मृत्यू

भांडुप (पश्चिम) येथील पाटकर कंपाऊंडजवळील तुळशीपाडा परिसरात शनिवारी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास एका घराचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली.
Mumbai : भांडुपमध्ये घराचा भाग कोसळून वृद्धाचा मृत्यू
Mumbai : भांडुपमध्ये घराचा भाग कोसळून वृद्धाचा मृत्यूछायाचित्र : विजय गोहिल
Published on

मुंबई: भांडुप (पश्चिम) येथील पाटकर कंपाऊंडजवळील तुळशीपाडा परिसरात शनिवारी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास एका घराचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सुसाई देवदास काउंदर (७५) वृद्धाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

भांडुप पश्चिम तुळशीपाडा पाटकर कंपाऊंड येथील तळ अधिक एक मजली घराचा भाग कोसळला. घराचा भाग कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला आणि परिसरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. बचावकार्यादरम्यान ढिगाऱ्याखाली एक वृद्ध अडकल्याचे लक्षात आले. त्यानंतर बचावकार्यास वेग देत काउंदर यांना बाहेर काढले आणि नवकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेचा पुढील तपास अग्निशमन दलाचे अधिकारी, स्थानिक पालिकेचे अधिकारी व स्थानिक पोलीस करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in