Mumbai : पालिका कार्यालयातील वीज वापराचे मूल्यांकन होणार; तांत्रिक समितीची नियुक्ती

मुंबई महापालिका मुख्यालयासह २६ विभागीय कार्यालयात विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. विजेची व खर्चाची बचत व्हावी यासाठी तांत्रिक समितीची नियुक्ती करण्यात येणार आहे.
Mumbai : पालिका कार्यालयातील वीज वापराचे मूल्यांकन होणार; तांत्रिक समितीची नियुक्ती
Mumbai : पालिका कार्यालयातील वीज वापराचे मूल्यांकन होणार; तांत्रिक समितीची नियुक्तीसंग्रहित छायाचित्र
Published on: 

मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयासह २६ विभागीय कार्यालयात विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. विजेची व खर्चाची बचत व्हावी यासाठी तांत्रिक समितीची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही समिती वीज वापराचे मूल्यांकन करणार असून त्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्यात येणार आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमधील विद्युत वापराच्या पद्धतींचे आता सर्वकष मूल्यांकन करण्यात येणार असून यासाठी विजेच्या वापराचा आढावा घेण्यासाठी तांत्रिक समितीची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये टाटा पॉवर, महापारेषण आणि महापालिका विद्युत व यांत्रिक विभागाचे निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश या समितीमध्ये असेल.

ही समिती दोन महिन्यांमध्ये आपला अहवाल महापालिकेला सादर करणार असून यामध्ये विजेचा वापरासंदर्भात काही शिफारशी तसेच पालिकेच्यावतीने निर्मित केल्या ऊर्जा प्रकल्पांबाबतच्या शिफारशी अपेक्षित आहेत. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.‌

विजेच्या वापराचे मूल्यांकन झाल्यास त्याप्रमाणे विजेचा वापर कसा आणि किती केला गेला त्याप्रमाणे तो अधिक चांगल्या प्रकारे कशा प्रकारे केला गेला पाहिजे, यावर अधिक प्रभावी उपाययोजना करता येतील. त्याचबरोबर पालिकेकडून योग्य तो पायंडाही घातला जाईल.

सर्वंकष निदानात्मक अहवाल अपेक्षित

मुंबई पालिकेच्या मुख्यालयासह विविध २६ प्रशासकीय कार्यालये तसेच इतर कार्यालयांमध्ये विजेचा वापर आणि ऊर्जा बचत आदींबाबत आढावा घेवून सर्वंकष अहवाल बनवण्यासाठी तांत्रिक समितीची निवड करण्याचा निर्णय यांत्रिक व विद्युत विभागाने घेतला आहे. त्यामध्ये तज्ज्ञ निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश असेल. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सध्याच्या वीज वापराच्या पद्धती, ऊर्जा बचतीची क्षमता तसेच महापालिकेच्या मालकीच्या कॅप्टिव्ह वीज निर्मिती प्रकल्पांच्या कार्यक्षेत्राचा सर्वंकष निदानात्मक अहवाल या समितीकडून अपेक्षित आहे.

तांत्रिक समितीमध्ये तज्ज्ञांचा समावेश

या समितीकडून विश्लेषणाचे काम व अहवाल हे विशेष स्वरूपाचे काम केले जाणार आहे. तसेच आवश्यक तांत्रिक कौशल्याचे आणि वेळबद्ध स्वरूपाचे असल्याने या क्षेत्रातील तज्ञांचा समावेश या तांत्रिक समितीमध्ये करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेच्या विविध विभागांमधील विद्युत वापराच्या पद्धतींचे आता सर्वकष मूल्यांकन करण्यात येणार आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)