Mumbai : पारंपरिक कबड्डी खेळासाठी अल्प दरात मिळणार मैदान; पालिका सभागृहाची मंजुरी

कबड्डी हा पारंपरिक मातीतील खेळ असून कबड्डी खेळासाठी आता मुंबईत अल्प दरात मैदान उपलब्ध होणार आहे. ठाकरे सेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी मांडलेल्या ठरावाच्या सूचनेला महापौर रितू तावडे यांनी मंजुरी दिली आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : कबड्डी हा पारंपरिक मातीतील खेळ असून कबड्डी खेळासाठी आता मुंबईत अल्प दरात मैदान उपलब्ध होणार आहे. ठाकरे सेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी मांडलेल्या ठरावाच्या सूचनेला महापौर रितू तावडे यांनी मंजुरी दिली आहे.

व मुंबईतील मध्यमवर्गीय गिरणगाव परिसरातील अनेक खेळाडूंनी देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. तरीही, सध्या योग्य मैदाने उपलब्ध नसल्यामुळे खेळाडूंच्या सरावात अडथळे निर्माण होत आहेत. सरावाचा अभाव, दुखापतींचे वाढते प्रमाण आणि पारंपरिक मातीत खेळल्या जाणाऱ्या कबड्डीऐवजी कृत्रिम मॅटवरील स्पर्धांचे वाढते प्रमाण, यामुळे खेळाडूंच्या नैसर्गिक कौशल्यावर परिणाम होत आहे.

मुंबई शहर व उपनगरांतील कबड्डी संघटनांना स्पर्धा आयोजित करण्यासाठी खासगी जागांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे स्पर्धांचे आयोजन कमी प्रमाणात होत असून नवोदित खेळाडू तयार होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या अखत्यारितील क्रीडांगणे कबड्डी स्पर्धांसाठी अल्प दरात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नगरसेविक सचिन पडवळ यांनी महापालिका सभागृहात केली होती. या ठरावाच्या सुचनेला मंजुरी महापौर रितू तावडे यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे पालिका प्रशासन यासाठी धोरणात्मक निर्णय कशाप्रकारे घेतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

logo
marathi.freepressjournal.in