भाजपच्या गटनेतेपदी गणेश खणकर; शिवसेनेच्या गटनेतेपदी अमेय घोले

भाजपचे प्रवक्ते तथा नगरसेवक गणेश खणकर यांची मुंबई महापालिकेतील गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेचे नगरसेवक म्हणून अमेय घोले यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
भाजपच्या गटनेतेपदी गणेश खणकर; शिवसेनेच्या गटनेतेपदी अमेय घोले
भाजपच्या गटनेतेपदी गणेश खणकर; शिवसेनेच्या गटनेतेपदी अमेय घोले
Published on

मुंबई : भाजपचे प्रवक्ते तथा नगरसेवक गणेश खणकर यांची मुंबई महापालिकेतील गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेचे नगरसेवक म्हणून अमेय घोले यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि शिंदेसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी या दोन्ही नेत्यांच्या नावाची घोषणा केली. दरम्यान, भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी सोमवारी कोकण आयुक्तांकडे स्वतंत्र नोंदणी केली असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांची नोंदणी मंगळवारी कोकण आयुक्तांकडे करण्यात येणार आहे.

पालिका निवडणुकीनंतर प्रत्येक पक्षाला संख्याबळानुसार गटनेता जाहीर करणे आवश्यक आहे. त्यानुसार काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), मनसे, एमआयएम यांनी आपल्या पक्षाचे गटनेते जाहीर केल्यानंतर सोमवारी भाजप, शिवसेनेने (शिंदे) गटनेते जाहीर केले. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी गणेश खणकर यांची तर शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी अमेय घोले यांची गटनेतेपदी निवड जाहीर केली. यावेळी सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपचे माजी खासदार मनोज कोटक, आमदार पराग अळवणी आणि भाजपचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचे ८९ नगरसेवक निवडून आले असून भाजपचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापौरपदी राजश्री शिरवाडकर यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले असून स्थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे समजते.

logo
marathi.freepressjournal.in