मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प लांबणीवर पडण्याची चिन्हे; यंदाचा अर्थसंकल्प ८२ हजार कोटींच्या घरात जाणार

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प २०१७ च्या निवडणुकीमुळे एप्रिल महिन्यात तर २०१२ च्या निवडणुकीमुळे २९ मार्चला अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता तर २०२६-२७ चा अर्थसंकल्प महापौर व उपमहापौर निवडीच्या कचाट्यात सापडल्यामुळे लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
मुंबई महापालिका
मुंबई महापालिका
Published on

मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प २०१७ च्या निवडणुकीमुळे एप्रिल महिन्यात तर २०१२ च्या निवडणुकीमुळे २९ मार्चला अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता तर २०२६-२७ चा अर्थसंकल्प महापौर व उपमहापौर निवडीच्या कचाट्यात सापडल्यामुळे लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे महापौरपदाची व स्थायी समिती अध्यक्षाची निवड झाल्यानंतरच २०२६-२७ चा अर्थसंकल्पीय अंदाज स्थायी समितीला पालिका आयुक्त सादर करतील. दरम्यान, २०२५-२६ चा ७४ हजार ४१७.४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता तर यंदाच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद करण्यात येणार असून यंदाचा अर्थसंकल्प ८२ हजार कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

प्रशासक म्हणून त्या त्या आयुक्तांनी २०२३, २०२४ व २०२५ चा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष म्हणून स्वतःला सादर केला होता. मात्र यंदा मुंबई महापालिका निवडणुकीची प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे महापौर व उपमहापौर निवडीनंतर स्थायी समिती अध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे तर दुसरीकडे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्याची लगबग सुरू आहे. परंतु अद्याप महापौर, उपमहापौर व स्थायी समिती अध्यक्षांच्या नावाची घोषणा झालेली नाही. त्यामुळे स्थायी समितीची घोषणा झाल्यावर पालिका आयुक्त २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करतील, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी पालिकेच्या लेखा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गेले दोन महिने मेहनत घेतली आहे. पालिकेचा अर्थसंकल्पीय अंदाज तयार असून स्थायी समितीला सादर करण्याची फक्त प्रतीक्षा आहे.

logo
marathi.freepressjournal.in