Mumbai : अतिक्रमणांवर हातोडा; दादर स्थानक परिसरात पदपथ झाले मोकळे, ‘जी’ उत्तर विभागाची कारवाई

पदपथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी असून ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत ‘जी’ उत्तर विभागात दादर पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरातील फुटपाथवरील बेकायदा बांधकामे, स्टॉल्स, दुकानांवर हातोडा फिरवण्यात आला.
Mumbai : अतिक्रमणांवर हातोडा; दादर स्थानक परिसरात पदपथ झाले मोकळे, ‘जी’ उत्तर विभागाची कारवाई
Mumbai : अतिक्रमणांवर हातोडा; दादर स्थानक परिसरात पदपथ झाले मोकळे, ‘जी’ उत्तर विभागाची कारवाई
Published on: 

मुंबई : पदपथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी असून ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत ‘जी’ उत्तर विभागात दादर पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरातील फुटपाथवरील बेकायदा बांधकामे, स्टॉल्स, दुकानांवर हातोडा फिरवण्यात आला. दादर, माटुंगा, सायन, धारावी परिसरातील पदपथांवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे, असा इशारा ‘जी’ उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश देसाई यांनी दिला.

फुटपाथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी असून ५० टक्के मुंबईकर त्यांचा वापर करतात. त्यामुळे पादचाऱ्यांना सुरक्षित पदपथ उपलब्ध करुन देणे मुंबई महापालिकेची जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशानुसार ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत मुंबई महापालिकेच्या २६ विभागीय कार्यालय क्षेत्रात अभियान राबविण्यात येत आहेत. परिमंडळ २ चे उपायुक्त प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ‘जी’ उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली विभागातील पदपथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी ही कारवाई राबविण्यात येत आहे.

पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कारवाई

सहायक आयुक्त योगेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली एम. सी. जावळे मार्ग तसेच दादर रेल्वे स्थानक परिसरात ही कारवाई करण्यात आली. दादर स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते. मात्र, पदपथांवर झालेले अनधिकृत अतिक्रमण, विविध प्रकारच्या हातगाड्या, फेरीवाले तसेच अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या वस्तूंमुळे पादचाऱ्यांना पदपथाऐवजी रस्त्यावरून चालावे लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर जी/उत्तर विभागाने अतिक्रमणांविरोधात कारवाई करत पादचाऱ्यांसाठी मार्ग मोकळा करण्यावर भर दिला. ‘पेडेस्ट्रियन फर्स्ट’ या संकल्पनेनुसार शहरातील पदपथ, रस्ते आणि पादचारी मार्गांवर नागरिकांना सुरक्षितपणे वावरता यावे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in