अतिक्रमणांवर हातोडा! मस्जिद बंदरच्या नंदलाल जानी मार्गावरील दुकाने, सिमेंट ओटे जमीनदोस्त; BMC च्या ‘बी’ वार्डाची तोडक कारवाई

 ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत अतिक्रमणमुक्त फुटपाथच्या कारवाईला वेग आला आहे. मुंबई महापालिकेच्या ‘बी’ विभागांतर्गत मंगळवारी मस्जिद बंदर येथील नंदलाल जानी मार्ग परिसरातील दुकाने, सिमेंट ओटे, बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
अतिक्रमणांवर हातोडा! मस्जिद बंदरच्या नंदलाल जानी मार्गावरील दुकाने, सिमेंट ओटे जमीनदोस्त; BMC च्या ‘बी’ वार्डाची तोडक कारवाई
अतिक्रमणांवर हातोडा! मस्जिद बंदरच्या नंदलाल जानी मार्गावरील दुकाने, सिमेंट ओटे जमीनदोस्त; BMC च्या ‘बी’ वार्डाची तोडक कारवाई
Published on

मुंबई :  ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत अतिक्रमणमुक्त फुटपाथच्या कारवाईला वेग आला आहे. मुंबई महापालिकेच्या ‘बी’ विभागांतर्गत मंगळवारी मस्जिद बंदर येथील नंदलाल जानी मार्ग परिसरातील दुकाने, सिमेंट ओटे, बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. बी वार्डचे सहाय्यक आयुक्त जितेंद्र घोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत देखभाल विभागाचे सहाय्यक अभियंता, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक अभियंता तसेच परवाना व अतिक्रमण विभागाचे वरिष्ठ निरीक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी सहभागी झाले होते.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पदपथ आणि रस्ते अतिक्रमणमुक्त राखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया नियमितपणे सुरू राहणार आहेत. पादचाऱ्यांना सुरक्षित आणि मोकळा मार्ग उपलब्ध करून देणे तसेच वाहतुकीतील अडथळे दूर करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

मुंबईतील फुटपाथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी असून ५० टक्के मुंबईकर पायीच    प्रवास करतात. त्यामुळे मुंबईतील फुटपाथ अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पालिकेच्या २६ वार्डांच्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

पादचारी प्रथम

मुंबई महापालिकेच्या २६ वार्डांतील फुटपाथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी ‘पादचारी प्रथम’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मंगळवारी ‘बी’ वार्डातील मस्जिद बंदर परिसरातील फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली. पालिकेने केलेल्या कारवाईत दोन बेकायदा दुकाने व स्टॉल हटविण्यात आले. तसेच तीन सिमेंटचे ओटे जमीनदोस्त करण्यात आले.    काही दुकानांनी केलेले बेकायदा प्रोजेक्शन, ताडपत्री शेड तसेच रस्त्यावर ठेवण्यात आलेले विविध साहित्य हटविण्यात आले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in