Mumbai : गणेशोत्सवासाठी BMC सज्ज; महापौर, उपमहापौरांकडून विसर्जनस्थळांची पाहणी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर नागरिक, गणेशभक्त आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवश्यक नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे.
Mumbai : गणेशोत्सवासाठी BMC सज्ज; महापौर, उपमहापौरांकडून विसर्जनस्थळांची पाहणी
Mumbai : गणेशोत्सवासाठी BMC सज्ज; महापौर, उपमहापौरांकडून विसर्जनस्थळांची पाहणी(Photo-X)
Published on

मुंबई :गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर नागरिक, गणेशभक्त आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवश्यक नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. विसर्जनस्थळांवरील व्यवस्था, कृत्रिम तलावांची उभारणी, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी विविध विसर्जनस्थळांची पाहणी केली.

यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १४ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी मुंबईत सुमारे ३८३ हून अधिक कृत्रिम तलाव उभारले आहेत. सहा - फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी असलेल्या नैसर्गिक - विसर्जनस्थळांवरील तलावांमधील गाळ आणि कचरा काढून स्वच्छता - करण्यात आली आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला - प्रोत्साहन देण्यासाठी मूर्तीकारांना - शाडूची माती आणि पर्यावरणपूरक - रंग उपलब्ध करून देण्यात आले - आहेत. तसेच, गणेशोत्सवाच्या - पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, रस्त्यालगतच्या झाडांची आवश्यक छाटणी करणे आणि नागरिकांच्या सुरक्षित ये-जा व वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे.

महापौर आणि उपमहापौरांच्या पाहणी दौऱ्याची सुरुवात कुर्ला येथील शीतल तलावापासून झाली. त्यानंतर मुलुंड येथील मोरया तलाव, पवई तलाव, के-उत्तर विभागातील शामनगर तलाव आणि जुहू चौपाटी येथील विसर्जनस्थळाची पाहणी करण्यात यावेळी आली. विसर्जनस्थळांवरील नागरी सुविधा, कृत्रिम तलावांची व्यवस्था आणि विसर्जनाच्या दिवशी आवश्यक सुरक्षाव्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेण्यात आला. असलेल्या

विसर्जन स्थळांवर आवश्यकतेनुसार पुरेसे तराफे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि जीवरक्षक उपलब्ध करून द्यावेत. पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र फिरत्या शौचालयांची व्यवस्था करावी, असे निर्देश महापौर रितू तावडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. विसर्जनस्थळांवरील व्यवस्था अधिक सक्षम करून गणेशभक्तांची गैरसोय टाळावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निर्माल्यापासून खतनिर्मितीवर भर

उपमहापौर संजय घाडी यांनी विसर्जनस्थळांचे सुशोभीकरण, पुरेशा संख्येने जीवरक्षकांची नियुक्ती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व महापालिका प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या. तसेच, विसर्जनस्थळी संकलित होणाऱ्या निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रक्रियेबाबत संबंधित विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली. यंदाचा गणेशोत्सव स्वच्छ, सुरक्षित आणि सुंदर वातावरणात पार पडेल, असा विश्वास महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in