शिवाजी पार्कात ठाकरेंचाच आवाज घुमणार, दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा

शिवाजी पार्क मैदानावर यंदा दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला परवानगी दिली आहे. मात्र जर हा मेळावा होण्याआधीच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली, तर...
शिवाजी पार्कात ठाकरेंचाच आवाज घुमणार, दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : शिवाजी पार्क मैदानावर यंदा दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला परवानगी दिली आहे. शिवाजी पार्कातील दसरा मे‌ळाव्याकरिता या एकाच पक्षाचा अर्ज पालिकेला मिळाला होता.

मात्र जर हा मेळावा होण्याआधीच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली, तर त्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागेल, असे पालिकेने सांगितले. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा बीकेसी येथे होणार आहे. शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर शिवाजी पार्कवर कुणाचा दसरा मेळावा होणार, यावरून वाद निर्माण झाला होता.

यंदा शिवसेनेतर्फेच (उबाठा) महापालिकेच्या जी/उत्तर विभाग कार्यालयात १३ मार्च २०२४ रोजी दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता. त्याशिवाय यंदा शिंदे गटाकडून वा इतर कोणत्याही पक्षाकडून दसरा मेळावा घेण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे मुंबई महापालिकेने शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनाला (उबाठा) रीतसर परवानगी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in