Mumbai : अखेर सात वर्षांनंतर प्रमुख रुग्णालयांत MRI मशीन

एमआरआय मशीनच्या कमतरतेमुळे रुग्णांना तपासणीसाठी महिनोन् महिने प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र आता पालिकेच्या केईएम, नायर, सायन आणि कूपर या प्रमुख रुग्णालयात अत्याधुनिक ३-टेस्ला एमआरआय मशीन उपलब्ध होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
Mumbai : अखेर सात वर्षांनंतर प्रमुख रुग्णालयांत MRI मशीन
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

मुंबई : एमआरआय मशीनच्या कमतरतेमुळे रुग्णांना तपासणीसाठी महिनोन् महिने प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र आता पालिकेच्या केईएम, नायर, सायन आणि कूपर या प्रमुख रुग्णालयात अत्याधुनिक ३-टेस्ला एमआरआय मशीन उपलब्ध होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. गेल्या सुमारे सात वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वपूर्ण सुविधेचे उद्घाटन गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. या सुविधेसाठी मुंबई महानगरपालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रशासनाकडे हा विषय लावून धरला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून मुंबईकरांच्या सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

या मशीनमुळे एमआरआय तपासणीसाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. ३-टेस्ला तंत्रज्ञानामुळे अवयवांच्या अधिक स्पष्ट व अचूक प्रतिमा मिळणार असून निदान अधिक प्रभावीपणे करणे शक्य होणार आहे.

परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा

महापालिका रुग्णालयांत अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे, सर्वसामान्य मुंबईकरांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्य सेवा मिळवून देणे आणि प्रत्येक रुग्णाला आवश्यक औषधे व वैद्यकीय साहित्य मिळण्याचा हक्क सुनिश्चित करणे, हेच आमचे प्राधान्य आहे. रुग्णांच्या अडचणी सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक प्रभावी यंत्रणा उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी भूमिका हरीश भांदिर्गे यांनी घेतली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)