फलक प्रिंट करणाऱ्या ८६२ प्रिंटर्सवर एफआयआर; अवैध होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर्स छापणारे रडारवर

मुंबईच्या विद्रुपीकरणास कारणीभूत असलेल्या बेकायदा पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्जवर पालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्यात येते. आता तर फलक, पोस्टर्स बॅनर्स प्रिंट करून देणारे व्यावसायिक पालिकेच्या रडारवर आले आहेत.
फलक प्रिंट करणाऱ्या ८६२ प्रिंटर्सवर एफआयआर; अवैध होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर्स छापणारे रडारवर

मुंबई : मुंबईच्या विद्रुपीकरणास कारणीभूत असलेल्या बेकायदा पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्जवर पालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्यात येते. आता तर फलक, पोस्टर्स बॅनर्स प्रिंट करून देणारे व्यावसायिक पालिकेच्या रडारवर आले आहेत.

मुंबई महापालिकेने २५ वॉर्डात गेल्या दोन महिन्यांत तब्बल ८६२ प्रवासवर्णन एफआयआर दाखल करण्यात आला असून, पोलिसांच्या माध्यमातून पुढील कारवाई सुरू असल्याचे पालिकेच्या अनुज्ञाप्ती विभागाकडून सांगण्यात आले.

मुंबईच्या विकेंद्रीकरण कारणीभूत ठरणारे बेकायदा पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज हटवण्यात यावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला अनेकदा दिले आहेत. परंतु राजकीय पक्षांकडून वाढदिवस, राजकीय सभा अशा विविध कार्यक्रमासाठी राजकीय पोस्टर्स, बॅनर्सबाजी केली जाते. राजकीय पक्षांचे बेकायदा पोस्टर्स बॅनर्स असल्याने कारवाई करण्यास गेले असता, राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाई थंड बस्त्यात जाते, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा मुंबई महापालिकेला कारवाई बाबत जाब विचारला असता कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

प्रभागांतील सर्व वरिष्ठ निरीक्षक (परवाना) यांना पालिका कायदा १८८च्या कलम ३९४ भाग (४) अंतर्गत प्रासंगिक प्रेस, ऑफ-सेट प्रेस, चिथो प्रेस आणि कापडी, चामडे, प्लास्टिक किंवा धातूचे पत्रे यासह इतर कोणत्याही वस्तूंवर होर्डिग्ज, पोस्टरसाठी छपाई करणाऱ्यांवर जानेवारीत पालिकेने तपासणी/कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

तपासणी करताना संबंधित परवाना निरीक्षकांना पोस्टर, बॅनर्स आणि नंबरप्लेट छापण्यापूर्वी ते प्रदर्शित करण्यासाठी परवानगी मागण्यासाठी संबंधित व्यवसायाच्या मालकास निर्देश द्यावे. संबंधित प्रतिहेक्टरने पालिकेकडून परवानगी नसेल तर, एप्रिलांना जाहिरातीची कोणतीही सामग्री छापण्यास नकार द्यावा लागेल, असे या कारवाईच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच याबाबतचा अहवाल सात दिवसांत सादर करण्याचे निर्देश प्रशासनाने परवाना निरीक्षकांना दिले आहेत.

बॅनरमध्ये वापरलेले साहित्य आरोग्यासाठी घातक

बेकायदा बॅनर आणि होर्डिंग्ज अनेकदा पॉलिथिन आणि नॉन-बायोडिग्रेडेबल पदार्थांपासून बनलेले असतात. या बॅनरमध्ये वापरलेले साहित्य कधीकधी आरोग्यासाठी खूप घातक असते, असे याचिकाकर्त्याने न्यायालयात सादर केलेल्या याचिकेत म्हटले आहे.

कोणत्या भागात किती प्रिंटर्सना नोटिसा

वरळी जी दक्षिण ३३४

भायखळा/ ई १६२

दादर/ जी उत्तर ८६

अंधेरी/ के पूर्व ६८

एन/ घाटकोपर ४२

सी/ काळबादेवी ३१

माटुंगा/ एफ उत्तर २९

कांदिवली/ आर दक्षिण १२

मुलुंड/ टी १२

१ जाने. २०२३ ते २९ फेब्रु. २०२४ पर्यंतची कारवाई

राजकीय १९,८८५

व्यावसायिक ४,९३०

धार्मिक ३७,८२२

एकूण ६२,६३७

विविध पोलीस ठाण्यात एफआयआर : ४१०

न्यायालयात खेचले ७८२

logo
marathi.freepressjournal.in