येत्या आठवड्यात उद्घाटन, लोकार्पणाचा धूमधडाका

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आचारसंहिता लागू होण्याआधी मुंबई महापालिकेने विविध प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पणाचा सपाटा लावला आहे.
येत्या आठवड्यात उद्घाटन, लोकार्पणाचा धूमधडाका

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आचारसंहिता लागू होण्याआधी मुंबई महापालिकेने विविध प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पणाचा सपाटा लावला आहे.

२६ फेब्रुवारी रोजी गोखले पुलाची एक मार्गिकेचे लोकार्पण केल्यानंतर सोमवार ११ मार्च रोजी कोस्टल रोड प्रकल्पातील वरळी ते मरीन ड्राईव्ह दरम्यान एक मार्गिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला, तर येत्या काही दिवसांत नायर दंत रुग्णालय इमारतीचे उद्घाटन, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे भूमिपूजन या मोठ्या कामांसह इतर छोट्या कामांच्या उद्घाटनाचा सपाटा लागणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी पुढील काही दिवसांत आचारसंहिता लागू होणार आहे. लोकसभा निवडणुकीत मतदारराजाला आकर्षित उद्घाटन व लोकार्पणाचा सपाटा लावला आहे, तर पालिकेच्या विविध लहान-मोठे प्रकल्पांचे तसेच विकासकामांचे लोकार्पण करण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे, तर गेल्या काही दिवसांत वरळी कोळीवाडा येथे सी फूड प्लाझा खाद्यपदार्थ विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. तसेच विजेवर चालणाऱ्या फूड ट्रकचे वितरणही करण्यात आले. गिरगावात खोताची वाडी येथे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, गोरेगाव पश्चिम येथे महिला वसतिगृह, केम्प्स कॉर्नर येथे भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जीवनावरील भित्तीशिल्पाचे अनावरण करण्यात आले.

‘जीएमएलआर’चे भूमिपूजन

येत्या काही दिवसात गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे (जीएमएलआर) भूमिपूजन होणार आहे. तसेच तीन महिन्यांपासून बांधून तयार असलेल्या नायर दंत रुग्णालयाच्या इमारतीचे उद्घाटन होणार आहे. महिला बचतगटांना व्यावसायिक वस्तूंचे वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in