कुलाब्यातील पदपथावर BMC च्या कारवाईला वेग; ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत कारवाई सुरूच राहणार - सहा. आयुक्त उज्ज्वल इंगोले

‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत मुंबईतील फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम मुंबई महापालिकेने हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत ‘ए’ वार्डातील कुलाबा कॉजवे याठिकाणी फुटपाथवर अतिक्रमण केलेल्या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
कुलाब्यातील पदपथावर BMC च्या कारवाईला वेग; ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत कारवाई सुरूच राहणार - सहा. आयुक्त उज्ज्वल इंगोले
कुलाब्यातील पदपथावर BMC च्या कारवाईला वेग; ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत कारवाई सुरूच राहणार - सहा. आयुक्त उज्ज्वल इंगोले
Published on

मुंबई : ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत मुंबईतील फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम मुंबई महापालिकेने हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत ‘ए’ वार्डातील कुलाबा कॉजवे याठिकाणी फुटपाथवर अतिक्रमण केलेल्या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. ‘ए’ वार्डात फुटपाथवरील प्रत्येक अतिक्रमणावर कारवाई सुरू असून पुढेही ती सुरूच राहणार, असा इशारा ‘ए’ वार्डचे सहाय्यक आयुक्त उज्ज्वल इंगोले यांनी दिला आहे.

पदपथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी असून ५० टक्के मुंबईकर रस्त्यावरून चालणे पसंत करतात. त्यामुळे मुंबईकरांना अतिक्रमणमुक्त फुटपाथ देणे यासाठी मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी ‘पादचारी प्रथम’ हे धोरण अंमलात आणले आहे. विशेष म्हणजे हे फक्त धोरण आणून त्या गप्प बसल्या नाहीत, तर स्वतः जातीने सकाळीच मुंबईतील पदपथांची पाहणी करतात.

रविवारी सुट्टीच्या दिवशीही अतिक्रमणे हटवली

फुटपाथवर अतिक्रमण केलेले निदर्शनास आल्यास त्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेशच अश्विनी भिडे यांनी २६ विभागीय सहाय्यक आयुक्तांना याआधीच दिले आहेत. अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत ‘पादचारी प्रथम’ अभियान राबविण्यात येत आहे. रविवार सुट्टीचा दिवस असला तरी ‘ए’ वार्डात फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबविण्यात आली. कुलाबा कॉजवे येथे ‘ए’ विभागाद्वारे कारवाई करून अनधिकृत तसेच अटी व शर्तींचे उल्लंघन करणाऱ्या बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांचे सामान जप्त करण्यात आले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in