Mumbai : १०२ बेकरीचालकांना स्टॉप वर्क नोटीस; पालिकेच्या दणक्यानंतर १७५ बेकऱ्यांमध्ये लाकडाचा वापर बंद

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबईतील बेकऱ्यांना इंधनाचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पालिकेने कारवाईचा इशारा दिल्यानंतर ही दुर्लक्ष करणाऱ्या १०२ बेकरीचालकांना स्टॉप वर्क नोटीस बजावण्यात आली आहे. तर कारवाईचा इशारा देताच १७५ बेकरीचालकांनी लाकडाऐवजी इंधनाचा वापर करण्यास सुरुवात केली...
Mumbai : १०२ बेकरीचालकांना स्टॉप वर्क नोटीस; पालिकेच्या दणक्यानंतर १७५ बेकऱ्यांमध्ये लाकडाचा वापर बंद
Mumbai : १०२ बेकरीचालकांना स्टॉप वर्क नोटीस; पालिकेच्या दणक्यानंतर १७५ बेकऱ्यांमध्ये लाकडाचा वापर बंदप्रातिनिधिक छायाचित्र (रेडिट)
Published on

मुंबई : हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबईतील बेकऱ्यांना इंधनाचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पालिकेने कारवाईचा इशारा दिल्यानंतर ही दुर्लक्ष करणाऱ्या १०२ बेकरीचालकांना स्टॉप वर्क नोटीस बजावण्यात आली आहे. तर कारवाईचा इशारा देताच १७५ बेकरीचालकांनी लाकडाऐवजी इंधनाचा वापर करण्यास सुरुवात केली असून ६९ बेकऱ्यांमध्ये इंधनाचा वापर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे उपायुक्त अविनाश काटे यांनी दिली.

मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबईतील बेकऱ्या आणि इतर व्यवसायांमध्ये लाकूड आणि कोळशाचा वापर बंद करण्याचे आदेश मुंबई पालिका प्रशासन आणि प्रदूषण मंडळाने दिले आहेत. उच्‍च न्‍यायालयानेही ९ जानेवारी २०२५ रोजी घेतलेल्‍या सुनावणीत ६ महिन्‍यांच्‍या मुदतीत लाकूड आणि कोळसा याऐवजी पर्यायी स्‍वच्‍छ इंधनाचा अवलंब करण्‍याचे आदेश व्‍यावसायिकांना दिले आहेत.

लाकूड, कोळसा वापरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने लाकूड व कोळसा वापरणाऱ्या बेकऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असून त्यांना पीएनजी किंवा एलपीजी यांसारख्या स्वच्छ इंधनावर स्थलांतरित करणे अनिवार्य केले आहे. ज्या बेकरीचालकाने लाकडाऐवजी इंधनाचा वापर करत नसल्याचे निदर्शनास आल्यावर परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in