Mumbai : रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; कांदिवलीतील १५ वर्षांपासून प्रलंबित २७ बांधकामांवर हातोडा

पदपथांवर पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून ‘पादचारी प्रथम’ अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत पदपथ व रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून वाहतुकीसाठी आवश्यक मार्ग मोकळा करण्याच्या दृष्टीने मुंबई महापालिकेकडून विविध ठिकाणी निष्कासनाची कारवाई करण्यात येत आहे.
Mumbai : रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; कांदिवलीतील १५ वर्षांपासून प्रलंबित २७ बांधकामांवर हातोडा
Mumbai : रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; कांदिवलीतील १५ वर्षांपासून प्रलंबित २७ बांधकामांवर हातोडा
Published on: 

मुंबई : पदपथांवर पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून ‘पादचारी प्रथम’ अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत पदपथ व रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून वाहतुकीसाठी आवश्यक मार्ग मोकळा करण्याच्या दृष्टीने मुंबई महापालिकेकडून विविध ठिकाणी निष्कासनाची कारवाई करण्यात येत आहे. कांदिवली पश्चिम येथील मथुरादास मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन परिसरात रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरणारी २७ बांधकामांवर मंगळवारी हातोडा फिरवण्यात आला. ‘आर दक्षिण’ विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.

या ठिकाणी असलेल्या सुमारे ११० मीटर लांबीच्या रस्त्याच्या रुंदीकरणात मागील १५ वर्षांपासून ही २७ बांधकामे अडथळा ठरत होती. आता या रुंदीकरणाच्या कामातील अडथळे दूर झाल्यामुळे स्वामी विवेकानंद मार्गावरील, विशेषतः कांदिवली रेल्वे स्थानकाच्या दिशेने होणाऱ्या वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत अपेक्षित आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांनाही मोठा दिलासा मिळणार असून रहिवाशांची वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे.

अधिक सुलभ वाहतूक

उपायुक्त (परिमंडळ ७) मनीष वळंजू, आर दक्षिण विभागाच्या साहायक आयुक्त आरती गोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आर दक्षिण’ विभागामार्फत ही निष्कासन मोहीम राबविण्यात आली. या कारवाईसाठी ४ जेसीबी, ४० कामगार आणि १० अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली होती तसेच वायुप्रदूषण नियंत्रणविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी धूळ नियंत्रणाच्या उद्देशाने मिस्ट मशिन्सचा वापर करण्यात आला. रस्ता रुंदीकरणामुळे या परिसरातील वाहतुकीला अधिक सुलभता प्राप्त होण्यास मदत होणार आहे तसेच वाहनचालकांचा प्रवास अधिक सुरळीत होणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)