Mumbai : स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची उद्या घोषणा; भाजपची ४, शिंदे सेनेची २, तर ठाकरे सेनेची ३ नावे जाहीर

मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा बुधवारी पालिका सभागृहात करण्यात येणार आहे. भाजप, शिंदे सेना, काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या पक्षातून स्वीकृत नगरसेवकांची वर्णी मुंबई महापालिकेत लागणार आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारपर्यंत स्वीकृत नगरसेवकांच्या नावांचे अर्ज पालिकेच्या चिटणीस विभागाकडे सादर करण्याची अंतिम तारीख आहे.
Mumbai : स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची उद्या घोषणा; भाजपची ४, शिंदे सेनेची २, तर ठाकरे सेनेची ३ नावे जाहीर
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा बुधवारी पालिका सभागृहात करण्यात येणार आहे. भाजप, शिंदे सेना, काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या पक्षातून स्वीकृत नगरसेवकांची वर्णी मुंबई महापालिकेत लागणार आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारपर्यंत स्वीकृत नगरसेवकांच्या नावांचे अर्ज पालिकेच्या चिटणीस विभागाकडे सादर करण्याची अंतिम तारीख आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तिकिट न मिळाल्याने सर्वपक्षीय इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली होती. ऐन निवडणुकीत सर्वपक्षीय इच्छुकांनी बंडखोरी केली होती. त्यावेळी बंडखोरी शमवणे सर्वंच राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरली होती. बंडखोरांचे बंड शांत करण्यासाठी विविध आश्वासने दिली होती. त्यापैकी एक म्हणजे स्वीकृत नगरसेवक म्हणून मुंबई महापालिकेत वर्णी लावणे होते.

अखेर २५ फेब्रुवारी रोजी स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची घोषणा सभागृहात होणार आहे. मुंबई महापालिकेत काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेतेपद भूषवलेले प्रविण छेडा यांचे नाव भाजपकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून समोर आले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वे, माजी नगरसेवक बालकृष्ण ब्रीद यांची नावे समोर आली आहेत.

स्वीकृत नगरसेवक प्रस्ताव

  • भाजप (४) : प्रवीण छेड़ा, नितेश सिंह, प्रतीप करपे, कमलाकर दळवी.

  • शिवसेना शिंदे (२) : बालकृष्ण ब्रीद, राज सुर्वे.

  • शिवसेना ठाकरे (३) : साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर, कैलास पाठक.

  • काँग्रेस (१) : वीरेंद्र चौधरी.

logo
marathi.freepressjournal.in