Mumbai : नामनिर्देशित सदस्यत्वासाठी इच्छुकांकडून श्रेष्ठींची मनधरणी; सभागृहात आसन व्यवस्था मर्यादित

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप व शिंदे सेनेचे ११८ नगरसेवक निवडून आले आहेत तर ठाकरे बंधू व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे असे ७१ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे भाजप व शिंदे सेनेचा पालिकेत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तर ठाकरे बंधूंच्या नगरसेवकांना विरोधी बाकावर बसावे लागणार आहे.
Mumbai : नामनिर्देशित सदस्यत्वासाठी इच्छुकांकडून श्रेष्ठींची मनधरणी; सभागृहात आसन व्यवस्था मर्यादित
Published on

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप व शिंदे सेनेचे ११८ नगरसेवक निवडून आले आहेत तर ठाकरे बंधू व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे असे ७१ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे भाजप व शिंदे सेनेचा पालिकेत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तर ठाकरे बंधूंच्या नगरसेवकांना विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. २२७ निवडून आलेले तर १० नामनिर्देशित सदस्य असे एकूण २३७ नगरसेवक सभागृहात उपस्थित असणार आहेत. नामनिर्देशित सदस्यत्व मिळावे, यासाठी इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, मुख्यालयातील सभागृहाची आसन व्यवस्था २२७ ची असून १० नामनिर्देशित सदस्य वाढल्याने त्यांची आसन व्यवस्था करायची कुठे, असा प्रश्न प्रशासनाला सतावत आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात भाजप व शिंदे सेना युतीत लढले. भाजपला ८९ तर शिंदे सेनेला २९ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता दोन्ही पक्ष मिळून सत्ता स्थापन करणार आहेत तर ठाकरे बंधूसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे एकूण ७१ नगरसेवक निवडून आले आहेत.

असे असणार नामनिर्देशित सदस्य

भाजपचे ८९ नगरसेवक निवडून आले, त्यांना ४ व्यक्तींची नामनिर्देशित नगरसेवक म्हणून नियुक्ती करता येणार आहे. शिवसेनेचे (ठाकरे) ६५ आणि मनसेचे ६ शिवशक्ती युतीचे एकूण ७१ नगरसेवक आहेत, त्यांच्यावतीने तीन सदस्य महापालिकेत नियुक्त करण्यात येणार आहे.

सभागृहात बसणार कुठे?

२२७ निवडून आलेले नगरसेवक आणि दहा नामनिर्देशित सदस्य या प्रकारे आता २३७ एवढी सदस्य संख्या होणार असल्याने सभागृहात तेवढी आसन क्षमताही नाही, याची पूर्ण कल्पना असूनही महापालिका प्रशासनाच्यावतीने सभागृहाचे क्षेत्रफळ वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारची हालचाल झालेली नाही.

logo
marathi.freepressjournal.in