Mumbai : पर्यटक बस सेवेला मुदतवाढ; इलेक्ट्रिक बसच्या वापराला प्रोत्साहन

मुंबई पालिकेच्या विविध विभागांमध्ये पर्यटकांना शहरदर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या गाईडेड टूरिस्ट बस सेवेसाठी सात कंत्राटदारांना आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
Mumbai : पर्यटक बस सेवेला मुदतवाढ;  इलेक्ट्रिक बसच्या वापराला प्रोत्साहन
Mumbai : पर्यटक बस सेवेला मुदतवाढ; इलेक्ट्रिक बसच्या वापराला प्रोत्साहनप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

मुंबई : मुंबई पालिकेच्या विविध विभागांमध्ये पर्यटकांना शहरदर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या गाईडेड टूरिस्ट बस सेवेसाठी सात कंत्राटदारांना आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. सध्या सुरू असलेल्या कंत्राटाची मुदत ४ डिसेंबर २०२६ रोजी संपत असून, ती ४ जून २०२७ पर्यंत वाढवण्याची तयारी पालिकेने केली आहे.

पालिकेच्या विविध विभागांमध्ये पर्यटकांसाठी विनावातानुकूलित गाड्यांद्वारे ही सेवा सुरू आहे. नेहा ट्रेडिंग, अंबाजी ट्रॅव्हल्स, जो एंटरप्रायझेस, ब्रेनिक्स एंटरप्रायझेस आणि श्री पार्थ लॉजिस्टिक आदी सात कंत्राटदारांकडून ही सेवा पुरवली जाते. यामध्ये सीएनजी आणि बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे. या सेवेसाठी ५ मार्च २०२४ रोजी प्रशासकीय मंजुरी आणि २५ जून २०२६ रोजी स्थायी समितीची मंजुरी मिळाली होती. त्यानुसार दोन वर्षांच्या कंत्राटासह सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. आता पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार आहे.

ईव्ही गाड्यांची संख्या वाढवणार

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५ नुसार इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे, चार्जिंग सुविधांचे बळकटीकरण आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट आहे. सध्या २० टक्के इलेक्ट्रिक वाहने कार्यरत असून आगामी काळात वाहनांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवून ३० टक्क्यांपर्यंत नेण्याचे नियोजन आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)