सोने-चांदी वितळवणाऱ्या प्रदूषणकारी भट्टी, चिमणी जमीनदोस्त; पालिकेकडून सक्त कारवाईचा बडगा

सोने-चांदी वितळवण्यासाठी भट्टीचा वापर केला जातो. त्‍यातून निर्माण होणारे आम्ल आणि वायू आदी चिमणी/धुराडे याद्वारे हवेत सोडले जातात.
सोने-चांदी वितळवणाऱ्या प्रदूषणकारी भट्टी, चिमणी जमीनदोस्त; पालिकेकडून सक्त कारवाईचा बडगा
Published on

मुंबई : वायू प्रदूषणकारी सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या १२ भट्टी, चिमणी जमीनदोस्त करण्यात आले. पालिकेच्या सी विभागाने ही कारवाई केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

नागरी वस्‍तीत सोने चांदी वितळवणाऱ्या भट्टींवर (गलाई व्‍यवसाय) आणि आम्ल भट्टींवर (ॲसिड फर्नेस) पालिकेच्या सी विभाग कार्यालय अंतर्गत इमारत व कारखाने विभागाने सक्त कारवाईचा बडगा उगारला आहे. सी विभागातील पटवा चाळ आणि तेली गल्ली येथील सोने-चांदी वितळवणाऱ्या अर्थात गलाई व्‍यावसायिकांचे एकूण १२ धुराडे (चिमणी) जमीनदोस्त करण्‍यात आले आहेत. अशा प्रकारची कार्यवाही यापुढे देखील सुरू राहणार आहे, अशी माहिती सी विभागाचे सहाय्यक आयुक्त उद्धव चंदनशिवे यांनी दिली.

सोने-चांदी वितळवण्यासाठी भट्टीचा वापर केला जातो. त्‍यातून निर्माण होणारे आम्ल आणि वायू आदी चिमणी/धुराडे याद्वारे हवेत सोडले जातात. शास्‍त्रीय प्रक्रिया न करता सोडण्‍यात आलेल्या वायूमुळे मानवी आरोग्‍याला धोका पोहोचतो. या घातक वायूमुळे प्रदूषणात भर पडत असल्‍याने पालिकेने वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गलाई व्‍यावसायिकाविरोधात सक्त कारवाई केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in