

मुंबई : मालमत्ता कर उत्पन्नाचे मुख्य स्रोत असून मालमत्ताधारकांनी ५४८ कोटी ६९ ३४ लाख ८२ हजार ४८७ रुपयांचा कर थकवल्याचा प्रकार मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीतून उघडकीस आला आहे. थकीत मालमत्ता भरण्यासाठी ३४ थकबाकीदारांना २१ दिवसांची नोटीस बजावण्यात आली असून २१ दिवसांत थकीत रक्कम न भरल्यास जप्त मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल, असा इशारा नोटिसीतून दिला आहे.
नोटिसीची कालमर्यादा संपलेल्या ११ मालमत्तांची प्रत्यक्ष लिलाव प्रक्रिया सुरू करत इच्छुक खरेदीदारांकडून बोली निविदा मागविण्यात आल्या आहेत. लिलाव प्रक्रिया सुरू होताच ५ मालमत्ताधारकांनी १० कोटी ४५ लाख रुपयांचा थकीत कर भरणा केला आहे. मालमत्ताकर थकविणाऱ्या कर आस्थापनांविरोधात कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी स्पष्ट केले आहे.
मालमत्ताकर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ताकर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना पालिकेकडून कलम २०३ अन्वये जप्तीची नोटीस बजावण्यात येत आहेत. विहित मुदतीत कर भरणा न केल्यास संबंधित मालमत्तेवर कलम २०३, २०४, २०५, २०६ अन्वये प्रथमतः मालमत्तेतील चीज वस्तू जप्त करून लिलाव केला जाणार आहे.
सी विभाग : मे. मीनोचर माणिकशॉ गांधी व व्ही. डी. शहा यांच्या या नावे संमिश्र मालमत्ता (थकबाकी २ कोटी २४ लाख ४३ हजार ९२२ रुपये)
एफ दक्षिण विभाग : लमण रघुनाथ शेट्टी यांच्या नावे असलेला भूखंड (थकबाकी रक्कम ८९ लाख १५ हजार ९८८ रुपये)
एच पश्चिम विभाग : भिकाभाई एन. उपाध्याय व श्रीराम जे. भट यांच्या नावे असलेली व्यावसायिक मालमत्ता (थकबाकी १८ कोटी ८८ लाख १३ हजार ३७६ रुपये) पी उत्तर विभागात बच्चुभाई डब्ल्यू डी शॉ अॅण्ड कंपनी यांच्या नावे असलेले व्यावसायिक शेड (थकबाकी ३ कोटी २३ लाख ३ हजार ९३८ रुपये)
पी दक्षिण विभाग : मेसर्स अमीर पार्क अॅण्ड अॅम्युझमेंट पार्क यांच्या नावे हॉटेल (थकबाकी ३४ कोटी ५५ लाख ६५ हजार ४९९ रुपये)
ई विभाग : जयंत ऑईल मिल यांच्या नावे असलेली तेल गिरणी व गोदाम (थकबाकी १ कोटी ४१ लाख ९१ हजार ८० रुपये)
आर उत्तर विभाग : मेसर्स विकयलाल इन्व्हेस्टमेंट यांच्या नावे असलेला भूखंड (थकबाकी २ कोटी ४१ लाख ७९ हजार ३२९ रुपये)
डी विभाग : सरदार सईदना ताहीर सैफुदीन यांच्या नावे असलेले रुग्णालय (थकबाकी २१ कोटी ३ लाख ३६ हजार ७५२ रुपये)
डी विभाग : सरदार सईदना ताहीर सैफुदीन यांच्या नावे व्यावसायिक मालमत्ता (थकबाकी १३ कोटी ४७ लाख ८६ हजार २४५ रुपये)
एच पश्चिम विभाग : मेसर्स सुमेर असोसिएट्स यांच्या नावे मोकळा भूखंड (थकबाकी १८८ कोटी ४६ लाख २४७ रुपये)
एस विभाग : मेसर्स राजहंस असोसिएट्स यांच्या नावे व्यावसायिक मालमत्ता (थकबाकी ४७ कोटी ०२ लाख ९९ हजार ६८७ रुपये)
आर दक्षिण विभाग : जीवनश्रद्धा कॉ ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी यांच्या नावे भूखंड (थकबाकी ६४ लाख २९ हजार ४६१ रुपये)