Mumbai : 'नामांतराचा पाऊस' पडणार; पहिल्या महासभेत रस्ते, पूल नामांतराचे २० प्रस्ताव; पालिकेच्या २५ फेब्रुवारीच्या सभेत २७ प्रस्ताव

चार वर्षांनंतर मुंबई महापालिकेच्या पहिल्या सभागृहाची बैठक पार पडणार आहे. २५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पहिल्याच सभागृहात २७ पैकी २० प्रस्ताव रस्ते, पूल, चौक आदींच्या नामांतराचे आहेत.
Mumbai : 'नामांतराचा पाऊस' पडणार; पहिल्या महासभेत रस्ते, पूल नामांतराचे २० प्रस्ताव; पालिकेच्या २५ फेब्रुवारीच्या सभेत २७ प्रस्ताव
Mumbai : 'नामांतराचा पाऊस' पडणार; पहिल्या महासभेत रस्ते, पूल नामांतराचे २० प्रस्ताव; पालिकेच्या २५ फेब्रुवारीच्या सभेत २७ प्रस्ताव
Published on

मुंबई : चार वर्षांनंतर मुंबई महापालिकेच्या पहिल्या सभागृहाची बैठक पार पडणार आहे. २५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पहिल्याच सभागृहात २७ पैकी २० प्रस्ताव रस्ते, पूल, चौक आदींच्या नामांतराचे आहेत.

चार वर्षांनंतर मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडली आणि भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्ता स्थापन झाली आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी, शिक्षण समिती अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली असून आता २५ फेब्रुवारी रोजी सकाळी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार असून दुपारी सभागृहात स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. २५ फेब्रुवारी रोजी सभागृहाच्या पटलावर २७ प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहेत. त्यापैकी किती प्रस्तावांना मंजुरी द्यायची हे महापौरांच्या अधिकारात आहे. मात्र पहिल्याच सभेत २० प्रस्ताव नामांतराचे असून यावरून गदारोळ होण्याची नाकारता येत नाही. शक्यता मुंबई महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर एकूण २७प्रस्ताव मांडले असून त्यापैकी तब्बल २० प्रस्ताव हे शहरातील चौक, रस्ते आणि पुलांच्या नामकरण व नामांतरासंदर्भात आहेत, तर उर्वरित प्रस्तावांमध्ये तीन प्रस्ताव विविध समित्यांवरील सदस्य नियुक्तीबाबत आहेत, तर एक प्रस्ताव पदपथावरील गटई कामगारांना स्टॉल देण्यासंदर्भातील आहे.

निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने ३०० प्रस्तावांना मंजुरी दिली होती. तसेच निवडणुकीनंतरही ५० प्रस्तावांना मान्यता देण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या ठिकाणचे होणार नामांतर...

  • वरळी येथील स्विमिंग पूलचे 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव' असे नामकरण करण्यात येणार आहे.

  • गोरेगाव पश्चिम, बांगूर नगर येथील जालनिधी सोसायटीजवळील रस्त्यास 'भूदरमलजी धनुका रोड' असे नाव देण्यात येईल. लालबाग येथील बॉम्बे गॅस लेनमधील मैदानाचे नामकरण 'योगेश पाटील मनोरंजन मैदान' असे करण्यात येणार आहे.

  • घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज फ्लायओव्हर' असे नाव देण्यात येईल. काळा घोडा परिसरातील चौकाचे नामकरण 'सायमन पेरेस चौक' असे होणार आहे.

  • अंधेरी पश्चिम, बांडिवली हिल येथील रस्त्यास 'ॐ शिव शंकर मंदिर मार्ग' असे नाव देण्यात येईल. तसेच गुलमोहर रोडजवळील रस्त्यास 'गुलमोहर क्रॉस रोड ७ एक्स्टेंशन' आणि त्याच परिसरातील दुसऱ्या रस्त्यास 'गुलमोहर क्रॉस रोड ७ कनेक्टिंग लेन' अशी नावे देण्यात येणार आहेत.

  • अंधेरी पश्चिम, निर्मल हॉटेलजवळील रस्त्यास 'संगीतकार बप्पी लहरी मार्ग' असे नाव देण्यात येईल. मुलुंड कॉलनी, झुलेलाल मंदिराजवळील चौकाचे नामकरण' श्री झुलेलाल भगवान चौक' असे करण्यात येणार आहे.

  • मालाड पश्चिम येथील जलतरण तलावाला 'भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जलतरण तलाव' असे नाव देण्यात येईल. चेंबूर, संडू गार्डनजवळील रस्त्यास 'आचार्य श्री महाश्रवण रोड क्रमांक १७' असे नाव देण्यात येणार आहे.

  • मुलुंड पश्चिम, हिमांशू रॉय व जकरिया रोडवरील चौकाचे नामकरण 'आचार्य श्री महाप्रज्ञ चौक' असे करण्यात येईल. पवई येथील जंक्शनला 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक' असे नाव देण्यात येणार आहे.

  • वरळी येथील डॉ. जी. एम. भोसले मार्ग व हुतात्मा रमेश देवरुखकर मार्गजवळील जंक्शनला 'रामचंद्र म्हामुणकर मार्ग' असे नाव देण्यात येईल. परळ, आर. एम. भट शाळेजवळील रस्त्यास 'परळची देवी मार्ग' आणि जेरबाई वाडिया मार्गजवळील रस्त्यास 'वसंतराव विष्णू चोकेकर मार्ग' असे नामकरण करण्यात येईल.

  • अंधेरी पश्चिम, दत्ताजी साळवीजवळील चौकाचे 'शेठ के. डी. पोद्दार चौक' तसेच कुर्ला पूर्व येथील चौकाचे 'गौतम साबळे चौक' असे नामकरण करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in